लालू प्रसाद यादव दोन दिवसांत तुरुंगातून येणार बाहेर, सुटकेचा मार्ग अखेर मोकळा


वृत्तसंस्था

पाटणा – चारा गैरव्यवहारात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. एक -दोन दिवसांत ते तुरुंगातून बाहेर येतील. Lalu Prasad will release soon from jail

चारा गैरव्यवहारातील दुमका कोशागारातून अवैधरीत्या पैसे काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यांना झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश कुमारसिंह यांनी नुकताच जामीन मंजूर केला. मात्र न्यायलयीन कामकाजात वकील सहभागी न झाल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत. आता ‘बीसीआय’च्या निर्णयानंतर एक-दोन दिवसांत लालूंची सुटका होऊ शकेल, असे सांगण्यात आले.



लालूंसह ज्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने यापूर्वी मंजूर केला आहे, त्यांचीही सुटका होणार आहे. त्यांचे वकील जामिनाची हमी रक्कम भरू शकणार आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या (बीसीआय) जनरल कौन्सिलने हा निर्णय बुधवारी घेतल्याने लालू प्रसाद यांच्या सुटकेतील अडथळे दूर झाले आहेत. ‘बीसीआय’चे संयुक्त सचिव अशोक कुमार पांडेय यांनी राज्याच्या बार कौन्सिलला पत्र लिहून याबाबत माहिती दिली.

Lalu Prasad will release soon from jail

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात