Lakhimpur Kheri Case : केंद्राला घेरण्याची तयारी, काँग्रेसने राष्ट्रपती कोविंद यांना भेटण्याची वेळ मागितली, राहुल गांधींसोबत शिष्टमंडळात 7 नेत्यांचा समावेश


लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे. शिष्टमंडळाने राष्ट्रपतींसमोर वस्तुस्थिती तपशीलवार मांडण्याची परवानगी मागितली आहे. Lakhimpur Kheri Case Congress delegation led by Rahul Gandhi seeks appointment with President Ram Nath Kovind


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे. शिष्टमंडळाने राष्ट्रपतींसमोर वस्तुस्थिती तपशीलवार मांडण्याची परवानगी मागितली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीसाठी पत्र लिहिले आहे. या सात सदस्यीय शिष्टमंडळात राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, खासदार एके अँटनी, खासदार मल्लिकार्जुन खर्गे, खासदार अधीर रंजन चौधरी, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि गुलाम नबी आझाद राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जातील.

3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मृत शेतकरी लव्हप्रीत सिंहच्या नातेवाईकांची भेट घेतली. आपल्या लखीमपूर भेटीशी संबंधित एक व्हिडिओ जारी करताना राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले की, पीडितांना न्याय द्यावा लागेल. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी घटनास्थळी जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि लखीमपूर खेरी हिंसाचारात आंदोलक शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर ते दोन दिवस पोलीस कोठडीत होते. यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

आशिष मिश्राला अटक, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने शनिवारी लखीमपूर खेरी हिंसाचाराप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक केली. सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर त्याला मध्यरात्रीनंतर न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. एसपी यादव यांनी सांगितले की, न्यायदंडाधिकाऱ्यांनी आशिषला लखीमपूर खेरी जिल्हा कारागृहात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यादव यांनी सांगितले की, आशिषच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज करण्यात आला होता आणि न्यायालयाने या अर्जावर सुनावणीसाठी 11 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे.

Lakhimpur Kheri Case Congress delegation led by Rahul Gandhi seeks appointment with President Ram Nath Kovind

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर