लचित बरफुकन : औरंगजेबाच्या 50000 मुघल फौजेला ब्रह्मपुत्रेचे पाणी पाजणारा अजिंक्य योद्धा


  • 400 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून पराक्रमाची आठवण

प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वेकडचे शिवाजी असा बहुमान प्राप्त लचित बरफुकन यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचा पराक्रम आठवला आहे. लचित बरफुकन हे आसामचे असे सेनापती आहेत, ज्यांनी औरंगजेबाच्या तब्बल 50000 च्या मुघल फौजेला ब्रह्मपुत्रेचे पाणी पाजले होते. त्यांना पूर्वोत्तर राज्यांमधून अक्षरशः हाकलून लावले होते. आसामला इस्लामी आक्रमणापासून वाचविले होते. Lachit Diwas is special because we mark the 400th birth anniversary

मात्र, डाव्या इतिहासकारांनी लचित बरफुकन यांचा पराक्रमाचा देदिप्यमान इतिहास कायम झाकून ठेवला आणि औरंगजेबाच्या मुघल सैन्याचे महिमामंडन केले. पण लचित बरफुकन यांच्या पराक्रमाचा इतिहास फार काळ झाकून राहिला नाही. आसामच्या लोककथा, लोकसंगीत आणि जीवनशैलीतून तो कायम प्रवाही राहिला.

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर इतिहासात दडपलेल्या अनेक गौरवशाली घटना आणि पराक्रमी वीरांना पुन्हा एकदा उचित स्थान मिळायला सुरुवात झाली आहे. लचित बरफुकन यांची 400 वी जयंती केंद्र सरकार आणि आसाम सरकार मोठ्या गौरवाने साजरी करत आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेत सर्वोत्तम कॅडेटला लचित बरफुकन सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येते.

लचित बरफुकन हे आसाम मधल्या अहोम साम्राज्याचे सरसेनापती होते. त्यांनी औरंगजेबाच्या फौजेला असा तडाखा दिला की औरंगजेब आणि त्यानंतरचे मुघल शासक कधीच पूर्वोत्तर राज्यांकडे वळण्याची हिंमत करू शकले नाहीत. लचित बरफुकन यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1622 रोजी झाला. त्यांच्या रणकौशल्यामुळे त्यांना पूर्वेकडे शिवाजी असे संबोधले जाते. सन 1671 सराईघाटच्या लढाईत त्यांनी औरंगजेबाच्या तब्बल 50000 मुघली सैन्याचा दारूण पराभव केला होता.

लचित बरफुकन यांचे वडील आहोम साम्राज्याचे सरसेनापती होते. त्यांना मोमाई तमुली बोरबरुआ असे संबोधले जायचे. आसाम प्रांतात सन 1228 ते सन 1826 अशी तब्बल 600 वर्षे अहोम राजवट होती. तुर्क, अफगाण, मुघल या इस्लामी शासकांनी अनेकदा या राजवटीवर हल्ले चढवले होते. परंतु अहोम साम्राज्याने ते हल्ले यशस्वीरित्या परतवले होते. यातला सर्वात मोठा हल्ला औरंगजेबाच्या फौजेने 1671 मध्ये केला होता. त्यातला सराईघाटच्या युद्धात लचित बरफुकन यांच्या फौजेने औरंगजेबाच्या फौजेचा निर्णायक पराभव केला. त्यानंतर औरंगजेब आणि त्याच्यानंतरचे मुघल शासक कधीही पूर्वोत्तर राज्याकडे नजर वाकडी करून बघू शकले नाहीत.

मात्र या सराईघाटच्या लढाईनंतर एकाच वर्षात 1672 मध्ये अजिंक्य सेनापती लचित बरफुकन यांचा मृत्यू झाला. त्यांचा पराक्रमी इतिहास आसामच्या लोककथा, लोकगीते यातूनच समजत होता. परंतु सन 2000 नंतर त्यांच्या अधिकृत इतिहासावर इतिहासकारांनी प्रकाश टाकला. तोपर्यंत डाव्या इतिहासकारांनी फक्त मुघल इतिहासाचेच आणि शासकांचे महिमामंडन केले होते. आज लचित बरफुकन यांची 400 वी जयंती आहे. यानिमित्त आसाम आणि केंद्र सरकारने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Lachit Diwas is special because we mark the 400th birth anniversary

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात