कुलभूषण जाधव : पाकचे अटर्नी जनरल म्हणाले – कोणत्याही भारतीयाला जाधव यांना एकट्याने भेटू देणार नाही; उच्च न्यायालयाने वकील नियुक्तीची मुदत वाढवली

Kulbhushan Jadhav Case PAK Attorney General said will not allow any Indian to meet Jadhav in private

Kulbhushan Jadhav Case : इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासाठी स्थानिक वकील नेमण्याची मुदत वाढवली आहे. मंगळवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पाकिस्तान सरकारच्या वकिलांना सांगितले की, भारताशी संपर्क साधा. त्यांना सांगा की आम्ही त्यांना जाधव यांच्यासाठी वकील नेमण्यासाठी अधिक वेळ देत आहोत. मात्र, उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ही वेळ किती असेल हे स्पष्ट केलेले नाही. Kulbhushan Jadhav Case PAK Attorney General said will not allow any Indian to meet Jadhav in private


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : उच्च न्यायालयाने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासाठी स्थानिक वकील नेमण्याची मुदत वाढवली आहे. मंगळवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पाकिस्तान सरकारच्या वकिलांना सांगितले की, भारताशी संपर्क साधा. त्यांना सांगा की आम्ही त्यांना जाधव यांच्यासाठी वकील नेमण्यासाठी अधिक वेळ देत आहोत. मात्र, उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ही वेळ किती असेल हे स्पष्ट केलेले नाही.

काय आहे प्रकरण?

कुलभूषण जाधव हे रॉचे एजंट असून त्यांना 2016 मध्ये बलुचिस्तानमधून अटक करण्यात आल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. त्याचवेळी भारताचे म्हणणे आहे की, जाधव हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने ते इराणला गेले होते. तेथून आयएसआयने त्यांचे अपहरण केले.

2017 मध्ये पाकिस्तान लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने त्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) आव्हान दिले. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. 2019 मध्ये आयसीजेने शिक्षेला स्थगिती दिली होती. जाधव यांना भेटण्यासाठी पाकिस्तानला भारताला कॉन्सुलर प्रवेश देण्यास सांगितले होते.

सुनावणीत काय घडले?

पाकिस्तान सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल खालिद जावेद खान इस्लामाबाद न्यायालयात हजर झाले. म्हणाले- आम्ही ५ मे रोजी आमच्या अधिकाऱ्यांना जाधव यांच्या वकिलाच्या नियुक्तीसंदर्भात भारताशी संपर्क साधण्यास सांगितले होते. हा संदेश परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी भारताला दिला होता, परंतु भारताने जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही किंवा कोणतीही कारवाई केलेली नाही.

जाधव यांना एकांतात भेटायला मनाई

खालिद यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला सांगितले की, “भारताला कॉन्सुलर प्रवेश हवा आहे. त्यांची इच्छा आहे की, त्यांचे अधिकारी जाधव यांना एका स्वतंत्र खोलीत आणि एकटे भेटतील. आम्ही त्याला परवानगी देऊ शकत नाही. आम्ही त्याला (जाधव) एका भारतीयला खासगीत भेटू देण्याची जोखीम घेऊ शकत नाही. तो फक्त हात हलवूनही जाधवचे नुकसान करू शकतो. आम्ही ICJच्या पुनरावलोकन आदेशाचे पालन केले आहे. भारत मागे पडला आहे.”

खरेतर, खालिद हे उच्च न्यायालयाची दिशाभूल करत आहेत. पाकिस्तानची इच्छा आहे की, भारताने जाधव यांच्यासाठी एखादा पाकिस्तानी वकील निवडावा. साहजिकच तो पाकिस्तानसाठी सोयीचा ठरणार आहे आणि यामुळे कुलभूषण यांच्या अडचणीत अधिक वाढतील. पाकिस्तानची ही फसवणूक उधळून लावण्यासाठी भारताने अद्याप वकिलाची नियुक्ती केलेली नाही. जाधव यांच्यासाठी वकील म्हणून नियुक्ती करण्याची परवानगी भारताने पाकिस्तानी नसलेल्याला द्यावी अशी मागणी केली आहे. आयसीजेच्या आदेशात जाधव यांच्यासाठी नेमण्यात येणाऱ्या वकिलाच्या राष्ट्रीयत्वाबाबत चित्र स्पष्ट नसल्याने हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे.

Kulbhushan Jadhav Case PAK Attorney General said will not allow any Indian to meet Jadhav in private

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात