आसाममध्ये भाजप आमदाराच्या कारमध्ये कसे आले EVM?, आयोगाचा वस्तुनिष्ठ अहवाल; चार अधिकारी निलंबित, एका बूथवर पुन्हा मतदान

Know How did EVM Found in BJP MLA's car in Assam, Four officers suspended, re-voting at one booth

EVM Found in BJP MLA’s car in Assam : आसाममध्ये भाजप आमदाराच्या वाहनात EVM आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीकेचा भडिमार केला. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने आता मोठी कारवाई केली आहे. एएनआयने निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांना याप्रकरणी निलंबित केले आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, परिवहन प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल पीठासीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच पीओ आणि तीन इतर अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तथापि, EVM पूर्णपणे सील बंद होते, परंतु तरीही मतदान केंद्र क्रमांक 149 वर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Know How did EVM Found in BJP MLA’s car in Assam, Four officers suspended, re-voting at one booth


वृत्तसंस्था

नवी दिल्ली/गुवाहाटी : आसाममध्ये भाजप आमदाराच्या वाहनात EVM आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीकेचा भडिमार केला. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने आता मोठी कारवाई केली आहे. एएनआयने निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांना याप्रकरणी निलंबित केले आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, परिवहन प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल पीठासीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच पीओ आणि तीन इतर अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तथापि, EVM पूर्णपणे सील बंद होते, परंतु तरीही मतदान केंद्र क्रमांक 149 वर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने आसामच्या EVM घटनेशी संबंधित वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला आहे. निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, निवडणूक पथक 149-इंदिरा एमवी स्कूल ऑफ एलएसी 1 रतबारी (SC) चा वाटेत अपघात झाला होता. त्या पथकात एक पीठासीन अधिकारी आणि 3 निवडणूक कर्मचारी सामील होते. त्यांच्यासोबत एक कॉन्स्टेबल आणि एक होमगार्डही होते.

तपासात समोर आले हे सत्य

आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या कारमध्ये EVM आढळल्याने निवडणूक आयोगाने तपास केला. यानुसार, आसाममध्ये पथकाचे वाहन बिघडल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी भाजप आमदाराच्या वाहनातून लिफ्ट घेतल्याचे समोर आले. लिफ्ट घेऊन जेव्हा भाजप आमदाराच्या वाहनातून पथक परतत होते तेव्हा स्थानिकांनी त्यांना पाहिले आणि वाहन जागेवर अडवले. यानंतर स्थानिकांनी निवडणूक पथकाला वाहनाबाहेर काढले. यानंतर जमावाने हिंसक रूप धारण केले.

पूर्णपणे सील होते EVM

निवडणूक आयोगानुसार, जे EVM भाजप आमदाराच्या वाहनात आढळले आहे, ते मतदानानंतरचे आहे. सापडलेले ईव्हीएम पूर्णपणे सीलबंद होते. दरम्यान, निवडणूक आयोग जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या अहवालाचीही प्रतीक्षा करत आहे.

कसे उजेडात आले प्रकरण?

आसाम विधानसभा निवडणूक 2021 (Assam Assembly Election 2021) च्या पथरखंडी मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 1 एप्रिल रोजी मतदान झाले. यानंतर आसाममध्ये ईवीएमचे प्रकरण समोर आले. मतदानानंतर पथराखंडीतून भाजप उमेदवार कृष्णेंदू पॉल अडचणीत आले आहेत. काँग्रेसने त्यांच्याच कारमध्ये ईव्हीएम आढळल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने यावर त्यांना उत्तर मागितले आहे. काँग्रेस नेते सरल पटेल यांनी एक ट्वीट करून याबाबत माहिती दिली होती. त्यात म्हटले होते की, कृष्णेंदू पॉल यांच्या कारमधून ईवीएम आढळले. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने हे स्पष्ट करावे की, ईव्हीएम त्यांच्या कारमध्ये आलेच कसे? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.

आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी 77.21 टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये 10,592 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला हक्क बजावला. तथापि, आता या ईव्हीएम प्रकरणामुळे 149 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

Know How did EVM Found in BJP MLA’s car in Assam, Four officers suspended, re-voting at one booth

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात