सचिन वाझेंचे दाऊद कनेक्शन :अंबानी-स्कॉर्पिओ-अंडरवर्ल्ड-बनावट दहशतवाद असा रचला कट ; सर्वात मोठा धक्कादायक खुलासा ; ‘ हिरो’ बनण्यासाठी अंडरवर्ल्ड ‘व्हिलन’ची साथ?


  • दाऊदच्या सुरुवातीच्या काळात सुभाष सिंग ठाकूर याने दाऊदच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावल्याने सुभाष सिंग ठाकूर अंडरवर्ल्डमध्ये गुरु म्हणून प्रसिद्ध आहे.

  • असं सांगितलं जात आहे की सुभाष सिंग ठाकूरने 1993च्या साखळी बॉम्ब स्फोटानंतर दाऊदशी फारकत घेतली. पण या सुभाष सिंग ठाकूरने सचिन वाझेला कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या कारणासाठी मदत केली हे अजून गुलदस्त्यातच आहे.

  • ज्यामुळे लवकरच सुभाषसिंग ठाकूरची चौकशी केली जाईल असं एनआयए अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

  • सचिन वाझेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या गुरुची मदत घेतली होती, अशी माहिती एनआयए सूत्रांकडून मिळाली आहे. Sachin Waze’s Dawood connection: Ambani-Scorpio-underworld-fake terrorism plot; The biggest shocking revelation; Underworld ‘villain’ to become a ‘hero’?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई पोलीस दलातील एके काळचे सुपर कॉप आता सुपर व्हिलेन ठरत आहेत.सचिन वाझे यांच्याबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अँटेलिया समोर पार्क करण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा संबंध दहशतवादाशी जोडण्याकरता सचिन वाझेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या गुरुची मदत घेतली होती, अशी माहिती एनआयए सूत्रांकडून मिळाली आहे. 

कार अंबानी यांच्या घराजवळ पार्क केल्यानंतर दहशतवादी संघटना जैश-उल-हिंद या नावाचा संदेश मिळाला होता.या संघटनेने या प्रकरणात जबाबदारी स्वीकारली होती.

गाडीत जिलेटीनच्या कांड्या ठेवून एका नवीन, मात्र बनावट दहशतवादी संघटनेमार्फत घटनेला दहशतवादाशी जोडण्याचा कट सचिन वाझेने आखला होता.

दाऊदच्या गुरुने त्याचे काम चोखपणे बजावले. मात्र मनसुख हिरेन याची हत्या झाली आणि सचिन वाझेचा डाव आधीच उघडकीस येऊन बनावट दहशतवादी संघटनेचा कटही उघडकीस आला.

एकेकाळचा मुंबईतील दाऊदचा गुरु ज्याने दाऊदला अंडरवर्ल्ड दुनियेचा पहिला टप्पा गाठण्यात मदत केली त्या सुभाष सिंग ठाकूरच्या मदतीने सचिन वाझेने बोगस दहशतवादी संघटनेचा कट रचला . ठरल्याप्रमाणे सुभाष सिंग ठाकूर याने सचिन वाझे याच्या सांगण्यावरून एका मध्यस्थीच्या माध्यमातून UAE येथील सर्व्हरवरुन सोशल मीडियावर मेसेज पाठवला होता आणि त्याकरता मोबाईल फोन तिहार जेलमधील इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक तेहसीन अख्तर याच्याकडे पोहोचवण्यात आला. ज्यात UAE चा सर्व्हर सेट करण्यात आला होता.

हा मेसेज पाठवण्याकरता टेलिग्राम या सोशल मीडियावर JAISH-UL-HIND नावाने एक ग्रुप देखील बनवला गेला होता आणि तेहसीन हा या घटनेची जबाबदारी घेईल याची पूर्ण सेटींग करण्यात आली होती. ज्या करता सुभाष सिंग ठाकूर याने महत्वाची भूमिका बजावली. पण मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत या ग्रुपकरता वापरण्यात आलेल्या मोबाईलचे लोकेशन हे तिहार जेलमध्ये आढळून आले होते. त्यानुसार दिल्ली स्पेशल सेलने कारवाई करत 3 मोबाईल आणि काही सिमकार्ड तिहार जेलमधून जप्त केले होते. तसंच इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक तेहसीन अख्तर याची चौकशी देखील केली होती.

सुभाष सिंग ठाकूर याच्याशी संपर्क करण्यात एका माजी आणि वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याने सचिन वाझेला मदत केली, असा संशय NIA ला आहे. त्यामुळे लवकरच या अधिकाऱ्याची NIA चौकशी करणार असून सुभाष सिंग ठाकूर याची याआधी राज्यातीलच एका तपास यंत्रणेने चौकशी केली आहे. याच तपास यंत्रणेच्या चौकशीला पुढे नेत NIA आता या सुभाष सिंग ठाकूरची पुन्हा चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे.

JAISH-UL-HIND नावाने टेलिग्राम या सोशल मीडियावर सुरुवातीला पार्क करण्यात आलेल्या गाडीची जबाबदारी आम्ही घेत असून “यह तो अभी ट्रेलर है, पिच्चर अभी बाकी है” असा मेसेज पोस्ट करण्यात आला होता.
24 तासातच याच JAISH-UL-HIND नावाने टेलिग्रामवर पुन्हा मेसेज करुन या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही असा मेसेज करण्यात आला होता. तो कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला होता याचा शोध NIA घेत आहे.

Sachin Waze’s Dawood connection: Ambani-Scorpio-underworld-fake terrorism plot; The biggest shocking revelation; Underworld ‘villain’ to become a ‘hero’?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती