तमीळ अभिनेत्री खुशबू यांनी घटविले तब्बल २० किलो वजन


विशेष प्रतिनिधी

चेन्नई– तमीळ अभिनेत्री तसेच भाजपच्या नेत्या खुशबू सुंदर यांनी तब्बल २० किलो वजन घटविले आहे. त्यांचा हा कायापालट सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.

गेल्या वर्षी लॉकडाउनच्यावेळी आपले वजन जवळपास ९३ किलो होते. तेथून एक मोहीम हाती घेतली. आता आपण सर्वोत्तम सुदृढता साध्य केली आहे, अशी टिप्पणी करीत त्यांनी ट्विटरवर दोन टप्प्यांतील छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ऑक्टोबरमध्ये त्यांनी १५ किलो वजन कमी केले होते.


मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजप उमेदवार खुशबू यांच्यावर गुन्हा


खुशबू सुंदर यांनी इतके वजन घटविण्यात आलेल्या यशाचे रहस्य काय, याविषयी घरकाम असे उत्तर दिले. त्यांनी आधी ट्विट केले होते की, ७० दिवसांच्या कालावधीत मला मदतीला कुणी नव्हते.

घरातील सर्व कामे मी एकहाती करीत होते. झाडणे, फर्नीचरसह विविध वस्तूंवरील धुळ झटकणे, फरशी पुसणे, भांडी घासणे, कपड्यांना इस्त्री, बागकाम आणि स्वच्छतागृहाची सफाई अशी सर्वच कामे मी करीत होते. याशिवाय योगासने आणि प्लँकचाही बराच उपयोग झाला. मुख्य म्हणजे मी खूप खाणारी व्यक्ती नाही, जे पथ्यावर पडले.

Khushboo becames slim

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती