हुंडा आणि महिलांवरील अत्याचारांविरुध्द केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी ठेवला उपवास


विशेष प्रतिनिधी

तिरूवअनंतपुरम : हुंडाप्रथा आणि महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात निषेध म्हणून केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी उपवास केला. राज्यात एखाद्या राज्यपालांनी सामाजिक मुद्द्यासाठी उपवास करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.Kerala Governor Arif Mohammad Khan fasts against dowry and atrocities against women

खान यांनी बुधवारी सकाळी ८ वाजता उपवास सुरू केला. या सामाजिक समस्येविरोधात जनजागृती करत लोकांनी त्याचा विरोध करावा असे आवाहन केले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांनी हा उपवास केला. तत्पूर्वी त्यांनी गांधी भवनात आयोजित एका प्रार्थनासभेतही सहभाग घेतला. विविध गांधीवादी संघटनांच्या आवाहनानंतर त्यांनी हे पाऊल उचलले.



मागील महिन्यात खान यांनी युवतींना हुंड्याला नकार देण्याचे भावनात्मक आवाहन केले होते. या सामाजिक समस्येविरूद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणत्याही संघटनेच्या आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले होते.

आयुर्वेदाची विद्यार्थिनी विस्मया काही दिवसांपूर्वीच कोल्लम जिल्ह्यात पतीच्या घरी संशयास्पद अवस्थेत मृत आढळली होती. तिच्या सासरच्यांनी तिचा हुंड्यासाठी छळ केला होता, अशी तक्रार तिने आधी केली होती. तिच्या कुटुंबीयांची राज्यपालांनी भेट घेतल्यानंतर वरील प्रतिक्रिया दिली होती

लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यपालांनी गांधीवादी मागार्ने उचललेल्या या पावलाचे विरोधी पक्ष काँग्रेस व भाजपने समर्थन केले आहे. राज्यातील डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकास्त्रही सोडले आहे. पिनराई विजयन यांच्या सरकारच्या कार्यकाळात महिलांची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे तसेच अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी राज्यपालांना हे पाऊल उचलावे लागले, असेही विरोधकांनी म्हटले आहे.

Kerala Governor Arif Mohammad Khan fasts against dowry and atrocities against women

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात