Kerala Assembly Election 2021 Results Live : केरळच्या निवडणुकीवर अतिशय प्रभाव टाकणारे ‘हे’ आहेत मुद्दे…


विशेष प्रतिनिधी

धर्म आणि राजकारण : हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन या तीन समूहांमध्ये केरळचा समाज विभागला गेलेला आहे. यामध्ये हिंदू समाज हा बहुसंख्य असून त्यांचे प्रमाण 56 टक्के (1.8 कोटी) आहे तर मुस्लीम समाज 25 टक्के (89 लाख) आहे आणि ख्रिश्चन 19 टक्के (61 लाख) आहेत… त्यामुळे केरळच्या राजकारणात धर्म हा महत्त्वाचा घटक राहिला आहे. केरळमधील हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धार्मिक संस्था या खुलेपणाने राजकीय भूमिका घेताना दिसतात. बहुसंख्य असलेला हिंदू समाज हा काँग्रेसचा व डाव्या पक्षांचा पाठीराखा राहिला आहे. Kerala Assembly Election 2021 Results Live



दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचा प्रमुख जनाधार हा मुख्यतः हिंदू आणि विशेषतः इळावा आणि दलित समाज राहिला आहे. ख्रिश्चन हे काँग्रेसला व डाव्या पक्षांना मतदान करतात… नायर समाजाने कम्युनिस्ट विरोधातून नेहमीच काँग्रेसला मतदान केले आहे… परंतु सबरीमाला प्रकरणानंतर तो भाजपसोबत जाऊ लागलाय. मुस्लीम हे काँग्रेसला आणि डाव्या पक्षांना मते देतात… शिवाय मुस्लिमांचे स्वतंत्र राजकारण करणारा मुस्लीम लीग अस्तित्वात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हिंदूंची आणि ख्रिश्चनांची मते मिळवणे हे भाजपसमोरचे आव्हान असणार आहे. लव्ह-जिहाद, सबरीमाला आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) यांसारखे मुद्दे पुढे करत हिंदूंना आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. तसेच ख्रिश्चन समूहाला आपलेसे करण्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वाने चर्चमध्ये जाण्यावर आणि खिश्चन धर्मगुरूंच्या गाठीभेटींवर भर दिलेला आहे.

सबरीमाला प्रकरण : सबरीमाला आयप्पा मंदिर हे केरळमधील 800 वर्षे पुरातन मंदिर असून इथे 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी होती. सर्व महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डाव्या पक्षांनी व संघटनांनी मंदिर प्रवेशाची चळवळ उभी केली. सबरीमाला मंदिरप्रवेशाच्या चळवळीला दीर्घ इतिहास राहिला आहे. केरळमधील डाव्या पक्षांनी मंदिरप्रवेशाचा मुद्दा हा महिलांच्या समान हक्कांचा आणि सामाजिक सुधारणेचा ठरवत सांविधानिक चौकटीत सोडवण्याचा प्रयत्न चालवला आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2018 मध्ये सर्व वयोगटांतील महिलांना मंदिर खुले असल्याचा निर्णय दिला. या निर्णयावर संपूर्ण भारतात आणि केरळच्या समाजात मोठी चर्चा व आंदोलन घडून आले.

या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात 60 याचिका दाखल करण्यात आल्या. भारतीय जनता पक्षाने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात केरळमध्ये आंदोलन उभे केले. काँग्रेस पक्षाची या प्रकरणातील भूमिका ही संशयास्पद होती. महिलांना समान अधिकार मिळाला पाहिजे अशी भूमिका घेत दिल्ली काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले तर केरळ काँग्रेसने हा मुद्दा लोकभावनेचा ठरवत निर्णयाला विरोध दर्शवला. त्यामागे मतांचे राजकारण होते… कारण राज्यातील नायर समाज सबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या विरोधात होता. नायर सर्व्हिस सोसायटीने त्याविरोधात याचिका दाखल केली होती. नायर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिला आहे. नायर समाज आणि हिंदूंच्या मतांवर डोळा ठेवून काँग्रेसने मवाळ हिंदुत्वाची भूमिका घेतल्याचे दिसते. सबरीमाला मंदिर प्रवेश हा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. नायर आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण करत कम्युनिस्ट पक्षांना शह देण्याच्या काँग्रेसच्या व भाजपच्या डावपेचाचा तो भाग आहे.

विजयन यांची लोकप्रियता : मुख्यमंत्री पिनरई विजयन यांची लोकप्रियता हा महत्वाचा मुद्दा आहे. विजयन यांची प्रतिमा डाव्या पक्षांसाठी उभारी देणारी आहे.

विकासाचा मुद्दा : या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वांचे जाहीरनामे हे विकासावर भर देणारे होते

भ्रष्टाचार : हा केरळ विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा. सोन्याच्या तस्करीसारख्या बाबींशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रश्न उपस्थित केले गेले.

Kerala Assembly Election 2021 Results Live

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात