KCR – TRS : विरोधी ऐक्यापासून केसीआर भरकटले; तेलंगण राष्ट्र समितीलाच भारतीय राष्ट्र समिती करण्याचे मनसूबे!!


वृत्तसंस्था

हैदराबाद : काल-परवापर्यंत विरोधी ऐक्यासाठी देशभरातल्या सर्व भाजप विरोधी पक्षांशी संपर्क साधणाऱ्या केसीआर चंद्रशेखर राव यांनी अचानक काल आपला ट्रॅक बदलून विरोधी ऐक्याचे काम आपण करणार नसल्याचे जाहीर केले आहे. उलट तेलंगण राष्ट्र समितीला तेलंगणा पुरते मर्यादित न ठेवता भारतीय राष्ट्र समिती करण्याचे मनसूबे असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.KCR – TRS: KCR deviates from opposition unity; Plans to make Telangana Rashtra Samiti an Indian Rashtra Samiti

तेलंगण राष्ट्र समिती पक्षाच्या एकविसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांनी आपला ट्रॅक बदलला आणि आपण विरोधी ऐक्यात रस घेण्यापेक्षा आपलाच तेलंगण राष्ट्र समितीला भारतीय राष्ट्र समिती करण्याकडे अधिक लक्ष पुरवू असे स्पष्ट केले.ममता पवारांचा प्रतिसाद नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर के. चंद्रशेखर राव हे देश पातळीवर चर्चेत आले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ आपणही विरोधी एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, हे त्यांनी दाखवून दिले होते.

परंतु, काल तेलंगण राष्ट्र समितीच्या 21 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी अचानक ट्रॅक बदलला. केंद्रातले भाजप सरकार हटवून मोदींना पंतप्रधान पदावरून उतरवून दुसरा पंतप्रधान बनवणे हा आपला काही अजेंडा नाही. तर उलट आपल्याला देशाच्या प्रगतीचा पर्यायी अजेंडा मांडला पाहिजे, असे वक्तव्य केले. यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी कम्युनिस्टांचे उदाहरण दिले कम्युनिस्ट पार्टीचे काही नेते आपल्याला भेटले होते. त्यांनी देशात भाजपविरोधी आघाडी बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु तो आपण खारीज करून टाकला. कारण नुसती कोणतीही आघाडी बनवण्यात मतलब नाही. आपल्याला देशात पर्यायी विकासाचा अजेंडा तयार करावा लागेल. कारण आपल्या जर पॉलिसी इतक्या भारी आहेत तर आपण चीनपेक्षा मागे का? देशात जर आर्थिक महासत्ता बनण्याची क्षमता आहेत तर भारत अमेरिकेपेक्षा मागे का?, याचा विचार करण्याची अधिक गरज आहे, असे वक्तव्य राव यांनी केले आहे.

चंद्रशेखर राव यांनी अचानक विरोधी ऐक्यापासून फारकत घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या तेलंगण राष्ट्र समितीने प्रशांत किशोर यांच्याबरोबर काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यात फाटल्याचे दिसून येत आहे.

भाजपसाठी देखील दरवाजे खुले

या पार्श्वभूमीवर के चंद्रशेखर राव यांनी अचानक ट्रॅक बदलणे आणि विरोधी ऐक्यापासून फारकत घेणे याला राजकीय दृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. एक तर तेलंगणमध्ये स्वतःचे स्थान मजबूत करणे हे त्यांच्यापुढे आव्हान आहे आणि त्याच वेळी विरोधी ऐक्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना ममता बॅनर्जी, शरद पवार अथवा उद्धव ठाकरे यांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना ट्रक बदलावा लागल्याचे बोलले जात आहे परंतु त्याच वेळी तेलंगण राष्ट्र समितीचे रूपांतर भारतीय राष्ट्र समितीत करणे याचे सूतोवाच त्यांनी केल्याने आपली महत्त्वाकांक्षा वेगळ्या पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी त्याचबरोबर केंद्रीय पातळीवर काँग्रेस आणि भाजप यांची यांचे दरवाजे एकाच वेळी खुले ठेवण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी ही खेळी केली असल्याचे देखील बोलले जात आहे.

KCR – TRS: KCR deviates from opposition unity; Plans to make Telangana Rashtra Samiti an Indian Rashtra Samiti

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”