पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिणेच्या राज्यांमधल्या दौऱ्यामध्ये दोन राज्यांच्या नेतृत्वांमधला मोठा राजकीय फरक आज दिसून आला. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हैदराबाद दौऱ्यात उपस्थित राहण्याचे टाळले, तर दुसरीकडे पंतप्रधानांच्या चेन्नई दौऱ्यात मात्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या द्रविडी राजकारणाचे गोडवे गाऊन घेतले!! KCR avoids PM; Stalin sang the praises of Dravidian politics in front of the Prime Minister
मोदी यांनी तेलंगणात हैदराबादमध्ये इंडियन बिझनेस स्कूलच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण केले. परंतु मोदी यांच्या या दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रोटोकॉल नुसार हजर न राहता आपल्या मंत्र्याला पाठव पाठवले आणि ते स्वतः बंगलोर मध्ये जाऊन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमार स्वामी यांना भेटले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी तयार करण्यासाठी चंद्रशेखर राव प्रयत्नशील असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हैदराबाद दौऱ्याचाच “राजकीय मुहूर्त” स्वत:च्या बंगलोर दौऱ्यासाठी निवडून “राजकीय लपंडाव” खेळला!!
– द्रविडी राजकारणाचे गोडवे
पण दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेन्नई दौर्यात जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या कार्यक्रमास हजर राहून तामिळनाडूचे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सरकार कसे द्रविडी राजकारण करत आहे… सर्वसमावेशक विकासाची दृष्टी ठेवून तामिळनाडूला कसे पुढे नेत आहे, याचे सविस्तर वर्णन केले.
– 31000 कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तब्बल 31 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन या कार्यक्रमामध्ये तामिळनाडू सरकारने आणि केंद्र सरकारने एकत्र येऊन केले. यात रेल्वेचे 5 प्रोजेक्ट, चेन्नई बंगलोर एक्सप्रेसवेचे बांधकाम यांचाही समावेश आहे.
– मोदींनी गायले तमिळ संस्कृतीचे गोडवे
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात तमिळ भाषा आणि त्यामुळे संस्कृतीचे गोडवे गायले, तर एम. के. स्टालिन यांनी आपल्या भाषणात द्रविडी राजकारणाचे गोडवे गायले. दोन्ही नेत्यांनी आपापले राजकारण कसे सर्वसमावेशक आहे, सर्वांना एकजुटीने पुढे घेऊन जाणारे आहे याचेच स्वतंत्रपणे समर्थन केले!!
या निमित्ताने दक्षिणेकडच्या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजकारणातील नेमका हात भेट मात्र समोर आला. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधानांची भेट टाळली तर मी नेहमी पंतप्रधान आणि समोर स्वतःच्याच राजकारणाचा ढोल पिटून घेतला.
– ममता, केसीआर, स्टालिन
के. चंद्रशेखर राव आणि एम. के. स्टालिन या दोन्ही मुख्यमंत्र्यांची आपापल्या राज्याच्या राजकारणावर 100% पकड आहे. दोघांनाही आपापल्या राज्यांमध्ये प्रचंड बहुमत आहे. परंतु, दोन्ही नेत्यांच्या दृष्टिकोनात आता मूलभूत फरक असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः हा केंद्र सरकारकडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र खूपच भिन्न असल्याचे स्पष्ट होत आहे. चंद्रशेखर राव यांचे राजकीय वळण हळूहळू ममता बॅनर्जी आणि मोदी यांच्यातील राजकीय वैराच्या दिशेने जात आहे, तर एम. के. स्टालिन अद्याप “त्या” पातळीपर्यंत पोहोचले नसून त्यांनी आपल्या राजकीय बाज न सोडता पंतप्रधानांच्या बरोबर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे राजकीय कौशल्य दाखवून दिले आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App