हिजाब वाद : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणात कासिफ, नदीम दोघे शिवमोगा पोलिसांच्या ताब्यात

वृत्तसंस्था

शिवमोग्गा : कर्नाटकात शिवमोग्गा जिल्ह्यात हिजाब वादातून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्या दोन जणांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कासिफ आणि नदीम अशी त्यांची नावे असून कासिफवर आधीच 10 ते 12 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, अशी माहिती कर्नाटकचे मंत्री आणि शिवमोग्गा जिल्ह्याचे पालक मंत्री के. सी. नारायण गौडा यांनी दिली आहे.Kasif in the murder case of Bajrang Dal activist

कासिफ आणि नदीम या ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशी दरम्यान आणखी तीन जणांची नावे पुढे आली आहेत. ते सध्या फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. त्यांनाही लवकरच पकडण्यात येऊन या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असे नारायण गौडा यांनी स्पष्ट केले आहे.

– शिवमोग्गामध्ये कलम 144

शिवमोग्गा येथे हिजाबच्या वादातून बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची काल भोसकून हत्या करण्यात आली होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिवमोग्गामध्ये तणाव वाढल्याने शहरात 144 कलम लागू करावे लागले आहे.

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी मृत बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांची भेट घेतली. ही घटना झाली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. हर्षा ( 26 वर्षीय) असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. हर्षाने फेसबुक प्रोफाइलवर हिजाबच्या विरोधात पोस्ट लिहिली होती. त्याने भगव्या शालीचा वापर केला होता. पोलीस या प्रकरणाचा हिजाब वादाशी संबंध जोडून तपास करत आहेत.

अनेक हिंदू संघटना कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास विरोध करत आहेत. हिजाबच्या निषेधार्थ हे कार्यकर्ते भगवी शाल परिधान करून निषेध व्यक्त करत आहेत. वाढता तणाव पाहता संपूर्ण शिवमोग्गामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत.

144 कलम लागू केल्यानंतर आहे आज सकाळी शहर एक दोन ठिकाणी वाहने जाळपोळीचा प्रकार घडला आहे.

Kasif in the murder case of Bajrang Dal activist

महत्त्वाच्या बातम्या