Job opportunities : ईस्टर्न कोलफील्ड्स मध्ये सरकारी नोकरीची संधी!!; काय आहेत अटी?


प्रतिनिधी

मुंबई : इस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने (ECL) मायनिंग विभागात रिक्त जागांवर नोकर भरती करण्यासाठी सरकारी अध्यादेश जारी केला आहे. अधिकृत अध्यादेशानुसार एकूण ३१३ जागांवर भरती केली जाणार आहे. तर या जागांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून १० मार्च २०२२ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे.Government job opportunities in Eastern Coalfields

उपलब्ध जागांचे विवरण 

विनाआरक्षित – १२७ जागा

ईडब्ल्यूएस- ३० जागा

ओबीसी- ८३ जागा

अनुसूचित जाती- ४६ जागा

एसटी- २३ जागा

notiबॅकलॉग (एसटी) – ४ जागा

अर्जासाठीची १० मार्च २०२२ अंतिम तारीख 

नोकरीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असणे बंधनकारक आहे. वयाची कमाल मर्यादा ३० वर्ष इतकी आहे. तसेच एससी आणि एसटी आरक्षणातील उमेदवारांसाठी वयोगटाच्या कमाल मर्यादेत ५ वर्षांची वाढ करण्यात आली आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची वाढ करण्यात आली आहे. वयोमर्यादेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत नोटफिकेशन संपूर्ण वाचावे.

नोकरीसाठी उमेदवारचे कोणत्याही मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराने मायनिंग सरदारशिप सर्टिफिकेट किंवा इतर निर्धारित योग्यता प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. या पदावर नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दरमहा ३१,८५२ रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी इस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळ www.easterncoal.gov.in यावर भेट द्यावी. अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख १० मार्च २०२२ आहे.

Government job opportunities in Eastern Coalfields

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात