विशेष प्रतिनिधी
डेहराडून : उत्तराखंडमधील चंपावत येथे सोमवारी मोठी दुर्घटना घडली. चंपावत जिल्ह्यातील दांडा भागात सोमवारी रात्री लग्नावरून परतणारे एक वाहन दरीत कोसळून ११ वऱ्हाडींचा मृत्यू झाला. चंपावतपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी एका कुटुंबात लग्न होते. 11 die in vehicle crash Terrible accident at Champawat in Uttarakhand
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. खड्ड्यातून ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. टनकपूर-चंपावत महामार्गाला लागून असलेल्या सुखीधांग-दंडामिनार रस्त्यावर झालेल्या वाहन अपघातात १६ पैकी ११ जणांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
गंभीर जखमी झालेल्या चालकासह अन्य एका व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनातील सर्व लोक टनकपूरच्या पंचमुखी धर्मशाळेत झालेल्या लग्नात सहभागी होऊन घरी परतत होते. काल रात्री ३.२० च्या सुमारास वाहन अनियंत्रित होत खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.
काकनई येथील रहिवासी लक्ष्मण सिंह यांचा मुलगा मनोज सिंग याच्या लग्नाला सर्वजण गेले होते. मृतांपैकी बहुतांश हे लक्ष्मण सिंह यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाची प्रकृती अधिक गंभीर आहे. मृत काकनई येथील दांडा आणि काथोटी गावातील आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App