दहशतवाद : ड्रग्सच्या पैशावर पोसलेल्या अल कायदाच्या टार्गेटवर काश्मीर; मोदी सरकारपुढे मोठे आव्हान!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : ओसामा बिन लादेनची आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल- कायदा ही संघटना पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. आता या अल कायदाची वक्रदृष्टी भारताचे नंदनवन काश्मीरकडे वळली आहे. भारताच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. मोदी सरकार पुढे मोठे आव्हान उभे राहत आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. Kashmir targeted by Al Qaeda for drug money

अल कायदाची भारतीय उपखंडातील संघटना क्यूआयएसने आपल्या “नवा ए अफगाण जिहाद” या मासिकाचे नाव बदलून “नवा गजवा ए हिंद” असे ठेवले आहे. यात आता सातत्याने काश्मीर विषयक विषारी प्रचार केला जात आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर, दहशतवाद्यांचा एक हेतू पूर्ण झाला. त्यांनी आता भारत आणि काश्मीरकडे लक्ष वळविण्याचे स्पष्ट दिसत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

– ड्रग्स तस्करीतून तालिबान कडे पैसा

तालिबानी सत्तेकडे आंतरराष्ट्रीय उत्पन्नाचे स्त्रोत फार कमी आहेत. मात्र, अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात हेराॅईन आणि इतर अमली पदार्थांच्या तस्करीतून तालिबानला प्रचंड पैसा मिळत आहे. त्याच्या पैशाचा वापर करून अल कायदा काश्मीर मधल्या आपल्या दहशतवादी कारवाया वाढविण्याची चिन्हे आहेत. काश्मिरी पंडित अन्वर सुरू झालेले हल्ले त्यांच्या टार्गेटेड हत्या या त्याच्याच खुणा असल्याचे मानले जात आहे. कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आज शाळेत घुसून एका शिक्षिकेची हत्या केली आहे.

– अहवाल काय सांगतो?

– अल कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना 2023 पर्यंत तरी आंतरराष्ट्रीय हल्ले करण्यास सक्षम नाहीत.

– मात्र, अफगाणिस्तानच्या भूमीत असलेले त्यांचे अस्तित्व जगासाठी चिंतेचा विषय असल्याचे अहवालात म्हटले आहे.

– अल कायदा सध्या स्लीपर सेलची भरती आणि भरती झालेल्या दहशतवादी तरुणांना घातपाती कारवायांचे प्रशिक्षण यावर भर देत आहे. पाकिस्तानातील अफगाण सीमावर्ती प्रांतातील तरुणांचा यात भरणा केला जात आहे.

Kashmir targeted by Al Qaeda for drug money

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था