विशेष प्रतिनिधी
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबर रोजी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये येणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान काशीच्या सुशोभिकरण आणि विकास कामांचे उद्घाटन करतील.या दरम्यान ते महत्त्वाकांक्षी काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. हा प्रकल्प प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धार, वाराणसी शहराची वाहतूक व्यवस्था सुलभ करणे आणि काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा पुनर्विकास करण्याशी संबंधित आहे.
काशी विश्वनाथ धाम हे आता नव्या रुपात दिसणार आहे. ज्याची आता सुरुवातही झाली आहे. १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट देशवासियांना भेट देणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे देवी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या काशी विश्वनाथांच्या प्रांगणाच्या पुनर्बांधणीला तब्बल अडीचशे वर्षांनंतर हे बांधकाम होत आहे.
राणी अहिल्याबाईंच्या योगदानाचे स्मरण करून श्री काशी विश्वनाथ धामच्या प्रांगणात त्यांचा पुतळा देखील बसविण्यात येणार आहे. त्यासोबतच तिथल्या भिंतीवरही त्यांच्या योगदानाची नोंद करण्यात येणार आहे. इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी देशभरात विविध ठिकाणी अनेक मंदिरे, घाट बांधले, पण काशीच्या इतिहासात त्यांचे स्थान अमिट आहे.
श्री विश्वनाथ धामचा इतिहास अहिल्यादेवी यांच्या योगदानाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळेच अहिल्याबाईंचा पुतळा विश्वनाथ धाममध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुघल शासक औरंगजेबाच्या आदेशावरून १६६९ मध्ये काशीचं हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ज्यामध्ये मंदिराचे पूर्ण नुकसान झाले होते. पण त्यानंतर विश्वनाथ मंदिराच्या प्रांगणाच्या पुनर्बांधणीचे श्रेय होळकर घराण्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडेच जाते. राणी अहिल्याबाईंनी काशीतील बाबा विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी तर करून घेतलीच, पण काशी विश्वनाथची प्राणप्रतिष्ठाही शास्त्रोक्त पद्धतीने केली होती.
काशीचे प्राध्यापक राणा पीव्ही सिंह म्हणतात, ‘अहिल्याबाईंचे योगदान हे अतुलनीय आहे. अहिल्याबाईंनी शास्त्रसंगत पद्धतीने शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली हेती. यातून राणी अहिल्याबाईंची दूरदृष्टी आणि सनातन संस्कृतीवरील निष्ठा दिसून येते. विश्वनाथ मंदिर हे काशीपासून वेगळे झाल्यास काय उरेल? तर काहीही नाही. जेव्हा मंदिराचे नुकसान झाले तेव्हा राणी अहिल्याबाई अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने तेथे पोहोचल्या आणि पुन्हा मंदिर उभारलं.’
महाराणी अहिल्याबाईंनी महादेवाचं मंदिर उभारुन महादेवाच्या भक्तांना सर्वात मोठी भेट दिली आहे. आज त्याच बांधकामाच्या २५० वर्षांनंतर काशीधामची पुनर्बांधणी होत आहे. त्या काळातील इतिहासाची पाने पाहिली तर राणी अहिल्याबाईंचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. काशी विद्या परिषदेचे सरचिटणीस प्रोफेसर राम नारायण द्विवेदी सांगतात की, ‘आचार्य नारायण भट्ट यांच्या निर्देशानुसार १७७७-१७८० काशी विश्वेश्वराची प्राणप्रतिष्ठा केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App