संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत – रशिया संबंध अन्य कोणत्याही देशांपेक्षा अधिक; अध्यक्ष पुतिन – पंतप्रधान मोदी भेटीत ग्वाही!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संरक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारत आणि रशिया यांचे संबंध अन्य कोणत्याही देशांपेक्षा अधिक आहेत, अशी ग्वाही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या भेटीच्या वेळी दिली आहे.Indo – Russian relationship in defense and technology is more than any country

भारत – रशिया द्विपक्षीय वाटाघाटींचा आज दिवस होता. भारत आणि रशिया यांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांनी दिवसभर या वाटाघाटी केल्या. सायंकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक हैदराबाद हाउस मध्ये शिखर बैठक झाली. यावेळी पुतिन यांनी भारत आणि रशिया यांचे संबंध अन्य कोणत्याही देशांपेक्षा संरक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये अधिक आहेत, अशी ग्वाही दिली.


राष्ट्रपती पुतीन यांच्या कट्टर विरोधकाच्या सुटकेसाठी रशियात जोरदार निदर्शने; अलेक्सी नेव्हल्नी यांच्या मुक्ततेसाठी नागरिक रस्त्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर भारत आणि रशिया यांच्यात संबंध पातळ झाले आहेत, अशी टीका काही बुद्धीमंत राजकारण यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वतः दोन्ही देशांमधले संबंध इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक आहेत, अशी ग्वाही दिल्याने त्याचे महत्त्व वेगळे अधोरेखित होते आहे.

भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार 38 अब्ज डॉलर्सचा आहे. रशियातून अधिक गुंतवणूक भारतात येते. भारताला आम्ही एक शक्तिशाली देश मानतो. संरक्षण उत्पादन, संशोधन यामध्ये सहकारी मानतो. आंतरराष्ट्रीय फोरमवर भारताचे रशियाला नेहमी सहकार्य मिळते. दहशतवाद विरोधी लढ्यात भारत नेहमी अग्रभागी राहिला आहे. आंतरराष्ट्रीय फोरमवर भारत आणि रशिया एकत्रितपणे दहशतवादाविरोधात आवाज उठवतात आणि परिणामकारक उपाययोजना देखील करतात. अफगानिस्तान मधील सध्याच्या परिस्थितीवर भारताने व्यक्त केलेल्या चिंतेविषयी रशिया सहमत आहे, असे पुतिन यांनी आवर्जून सांगितले.

भारत आणि रशिया यांची मैत्री काळाच्या कसोटीवर उतरून दीर्घकाळ वृद्धिंगत होत राहिली आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.

– स्पुटनिकचे लवकरच भारतात उत्पादन

कोरोना प्रतिबंधक लस स्फुटनिकचे लवकरच भारतात उत्पादन सुरू होईल. त्याविषयीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लार्गोव्ह यांनी दिली आहे. स्पुटनिक ही लस कोरोनावर 90 टक्के प्रभावी असल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. भारतात याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर ही लस अधिक स्वस्त उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Indo – Russian relationship in defense and technology is more than any country

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात