राष्ट्रपती पुतीन यांच्या कट्टर विरोधकाच्या सुटकेसाठी रशियात जोरदार निदर्शने; अलेक्सी नेव्हल्नी यांच्या मुक्ततेसाठी नागरिक रस्त्यावर


वृत्तसंस्था

मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक असलेले अलेक्सी नेव्हल्नी हे अटकेत आहेत. त्यांची तातडीने सुटका करावी, या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. Strong protests in Russia for the release of President Putin’s staunch opponent
अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नेव्हल्नी यांनी सतत टीका केली आहे. ते या आठवड्यात जर्मनीहून परत आले. त्यानंतर त्यांना तुरूंगात डांबले होते. जर्मनीत त्यांच्यावर रशियन एजंट नोविचोक याने विषप्रयोग केला होता. त्यातून ते बरे झाल्यावर मायदेशी परतले होते. रशिया सरकारने विषप्रयोग केल्याचा आरोप केल्यानंतर ते तुरुंगात आहेत.राशियातील अनेक शहरात अलेक्सी नेव्हल्नी यांच्या सुटकेसाठी रॅली, आंदोलने सुरु झाली आहेत. मॉस्को, सेंट पिटसबर्ग येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी सुमारे 2 हजार जणांना ताब्यात घेतले आहे. देशातील 70 शहरात आंदोलने सुरु आहेत. 2131 जणांपैकी मॉस्कोतून 300 तर सेंट पिटसबर्ग येथून 162 जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
मॉस्कोच्या पुष्किन्स्काया चौकात 4 हजार नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन करून निदर्शने केली. अडविणाऱ्या पोलिसांवर आंदोलकांनी प्लास्टिक बाटल्या आणि अंडी फेकून मारली. त्यामुळे अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 39 पोलीस अधिकारी या हिंसाचारात जखमी झाले आहेत.
सोमवारी कोर्टाच्या आदेशानंतर नेव्हल्नीला 15 फेब्रुवारीपर्यंत तुरूंगात रहावे लागणार आहे. आणि साडेतीन वर्षाची ठोठावलेली शिक्षा कायम करायची की नाही, याचा निर्णय कोर्ट घेणार आहे, असे वृत्त अल जझीराने दिला.

Strong protests in Russia for the release of President Putin’s staunch opponent

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती