कर्नाटकात बरोबर दोन वर्षांमध्ये नेतृत्वबदलाचे पाऊल; येडियुरप्पांनी बोलावली २६ जुलैला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पायऊतार होण्याचा निर्णय घेतल्याचे मानण्यात येत आहे. त्यांनी येत्या २६ जुलै रोजी कर्नाटक भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. Karnataka Chief Minister BS Yediyurappa calls Legislative Party MLAs and Ministers meet on 26th July 2021.

या बैठकीची अधिकृत घोषणा करण्यात आली असली. तरी त्याकडे नेतृत्वबदलाची बैठक म्हणून बघण्यात येत आहे. तत्पूर्वी, येडियुरप्पा यांनी दोन दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

बरोबर दोन वर्षांनंतर भाजपने कर्नाटकात भाजपने नेतृत्वबदलाचे पाऊल उचलले आहे. कारण २६ जुलै २०१९ रोजीच बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठकही त्यांनी २६ जुलै २०२१ रोजीच बोलावली आहे.

कर्नाटकात नेतृत्वबदल होणार की नाही हे मला माहिती नाही, हे येडियुरप्पा यांनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले होते. आज दुपारी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. आणि त्यांनी २६ जुलै रोजी कर्नाटक भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावल्याची बातमी सायंकाळी आली आहे. येडियुरप्पांविरोधातील तक्रारी वाढत असताना ही बैठक होत आहे.

Karnataka Chief Minister BS Yediyurappa calls Legislative Party MLAs and Ministers meet on 26th July 2021.

महत्त्वाच्या बातम्या