विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त विद्यार्थी नेता आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्ड होल्डर नेता कन्हैया कुमार कम्युनिस्ट पक्षातील कुचंबणेला वैतागला असून तो आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. कन्हैया कुमार याने नुकतीच राहुल गांधींची भेट घेतली आहे. Kanhaiya Kumar meets Rahul Gandhi, likely to join Congress; Jignesh Mevani in touch too
कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये घेऊन बिहारमध्ये महत्त्वाचे पद देण्यात येऊ शकते. बिहारमध्ये काँग्रेसची राजकीय प्रकृती तोळामासा आहे. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. परंतु त्या आघाडीचाच राष्ट्रीय जनता दलाला फटका बसल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी कन्हैया कुमार या पक्षात प्रवेश देऊन त्याच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठे काम सोपविण्यात येईल, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.
कन्हैया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्ष सीबीआयचा कार्ड होल्डर नेता आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला तो हजर होता. त्याने त्यात भाषणही केले. परंतु त्याने राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे मी ऐकले आहे, असे सीपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा यांनी पत्रकारांना सांगितले.
गुजरातमध्ये हार्दिक पटेल सारखा तरुण नेता काँग्रेसच्या हाताशी आहे. तसाच कन्हैया कुमार बिहारमध्ये हाताशी आला, तर पक्षाला संजीवनी मिळू शकते, असा काँग्रेस नेत्यांचा राजकीय होरा आहे.
परंतु कन्हैया कुमारची राजकीय पार्श्वभूमी संशयास्पद आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात “भारत तेरे तुकडे होंगे हजार” अशा घोषणा देण्याच्या वेळी कन्हैया कुमार तिथे हजर होता. त्याने त्या मेळाव्यात भाषण केले होते. याबद्दल त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला ही कोर्टात सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App