काँग्रेसच्या अध्यक्षपदी कमलनाथ यांची निवड होण्याच्या चर्चेला उधाण, भेटीगाठींना वेग


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सध्या अनेक बैठका होत आहेत. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. तशी घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. Kamalnath will may become congress president

कमलनाथ यांच्या नावाच्या चर्चेचा राजधानी दिल्लीत उधाण आले आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले कमलनाथ हे दिवंगत पंतप्रधान राजीव गाधी यांचे निकटचे सहकारी होते.

कमलनाथ काल काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटले. उत्तर प्रदेशातील निवडणूकीसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्याशी युतीबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका वद्रा या सुद्धा तेव्हा उपस्थित होत्या. मात्र यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत गांभीर्याने चर्चा झाल्याचे मानले जाते.

२०१७ मध्ये काँग्रेस-सप अशी युती होती, मात्र त्यांना दारुण अपयश आले. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ३१२ जागांसह एकतर्फी बाजी मारली. दुसऱ्या क्रमांकावरील सपच्या खात्यात केवळ ४७ जागा होत्या, तर काँग्रेसला केवळ सात जागांवर विजय मिळाला.

Kamalnath will may become congress president

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण