justice NV Ramana : जस्टिस एन. व्ही. रमना यांनी भारताचे नवे सरन्यायाधीश (CJI)म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. त्यांची नियुक्ती जस्टिस एसए बोबडे यांच्या जागेवर करण्यात आली आहे. 23 एप्रिल रोजी न्या. बोबडे सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. रमना यांनी भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. जस्टिस रमना 26 ऑगस्ट 2022 पर्यंत देशाच्या सरन्यायाधीश पदावर राहतील. justice NV Ramana takes oath as the new Chief Justice of India Know About Justice NV Ramana
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जस्टिस एन. व्ही. रमना यांनी भारताचे नवे सरन्यायाधीश (CJI)म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. त्यांची नियुक्ती जस्टिस एसए बोबडे यांच्या जागेवर करण्यात आली आहे. 23 एप्रिल रोजी न्या. बोबडे सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. रमना यांनी भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. जस्टिस रमना 26 ऑगस्ट 2022 पर्यंत देशाच्या सरन्यायाधीश पदावर राहतील.
सरकारी अधिसूचनेनुसार, संविधानाच्या अनुच्छेद 124 (2) नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी उच्च न्यायालयाच्या न्या. रमना यांना 24 एप्रिल 2021 रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले. परंपरेनुसार पंतप्रधानांचे मुख्य सचिव पीके मिश्रा आणि कायदे मंत्रालयातील सचिव (न्याय) बरुण मित्रा यांनी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले नियुक्तिपत्र मंगळवारी सकाळी जस्टिस रमना यांना सुपूर्द केले. सरन्यायाधीश (CJI) बोबडे यांनी त्यांच्यानंतर पद सांभाळण्यासाठी जस्टिस रमना यांच्या नावाची परंपरा आणि ज्येष्ठता क्रमानुसार शिफारस केली होती.
Delhi: Justice NV Ramana takes oath as the new Chief Justice of India (CJI). He was administered the oath by President Ram Nath Kovind, at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/jDESeLZh2D — ANI (@ANI) April 24, 2021
Delhi: Justice NV Ramana takes oath as the new Chief Justice of India (CJI). He was administered the oath by President Ram Nath Kovind, at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/jDESeLZh2D
— ANI (@ANI) April 24, 2021
(Know About Justice NV Ramana) एन. व्ही. रमना यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नावरम हे त्यांचे मूळ गाव. पूर्ण वेळ वकिली करण्यापूर्वी रमणा यांनी काही काळ एका तेलुगू दैनिकात पत्रकार म्हणूनदेखील काम केले होते. १७ फेब्रुवारी २०१४ पासून न्या. रमना हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ पासून त्यांनी राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे.
त्यांनी १९८३ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातून पूर्णवेळ वकिली करायला सुरुवात केली. केंद्रीय तसेच आंध्र प्रदेश प्रशासकीय लवाद आणि सर्वोच्च न्यायालयामध्येदेखील त्यांनी दिवाणी, फौजदारी, घटनात्मक, कामगार, सेवा आणि निवडणुकीशी संबंधित खटल्यांमध्ये विधिज्ञ म्हणून काम पाहिले होते.
पुढे केंद्र सरकारसाठी त्यांनी अतिरिक्त स्थायी सल्लागार म्हणून देखील काम पाहिले. ते हैदराबादेत काहीकाळ केंद्रीय प्रशासकीय लवादामध्ये भारतीय रेल्वेचे कायदा सल्लागार देखील होते. याचवेळी त्यांच्याकडे आंध्रप्रदेश सरकारची अतिरिक्त ॲडव्होकेट जनरल पदाचीदेखील जबाबदारी देण्यात आली होती. ते 2000 मध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात पूर्णवेळ न्यायाधीश बनले. पुढे त्यांची दिल्लीला मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाली आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्त करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालायाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. नुथालापती व्यंकट रमना यांनी आज सूत्रे स्वीकारली आहेत. रमना हे मागच्या चार दशकांपासून कायदा आणि न्यायव्यवस्थेचा भाग आहेत. जम्मू-काश्मीरमधील इंटरनेटवरील बंदी उठविणे, सरन्यायाधीशांचे कार्यालय आरटीआयच्या कक्षेत आणणे, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात बहुमत चाचणीचे निर्देश, असे महत्त्वाचे निकाल त्यांनी अलीकडच्या काळात दिले. त्याचे दूरगामी परिणाम झाले आहेत.
justice NV Ramana takes oath as the new Chief Justice of India Know About Justice NV Ramana
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App