काश्मिरात भिक्षेकरी महिलेच्या झोपडीत सापडला पैशांचा ढीग, पथकाला मोजताना लागली धाप, फोटोज व्हायरल

jammu kashmir found piles of money in the hut of an elderly begger woman, people tired of counting pictures viral

jammu kashmir : जम्मू-काश्मीरच्या नौशेरा येथे एक वृद्ध महिला बऱ्याच वर्षांपासून भीक मागून आपली गुजराण करत होती. भीक मागत असलेल्या वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात हलविण्यात आले आणि पालिकेच्या पथकाने वृद्ध महिलेच्या झोपडीची झडती घेतली असता सर्वांना धक्काच बसला. राजौरीच्या नौशेरा येथे भीक मागत असलेल्या वृद्ध महिलेच्या झोपडीत लाखो रुपये दिसले. या पथकाला वयोवृद्ध महिलेच्या झोपडीतून तब्बल 2,60,000 रुपये मिळाले आहेत. न्यूज एजन्सी एएनआयनेही महिलेच्या झोपडीतून मिळालेल्या या रकमेची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. jammu kashmir found piles of money in the hut of an elderly beggar woman, people tired of counting pictures viral


वृत्तसंस्था

नौशेरा : जम्मू-काश्मीरच्या नौशेरा येथे एक वृद्ध महिला बऱ्याच वर्षांपासून भीक मागून आपली गुजराण करत होती. भीक मागत असलेल्या वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात हलविण्यात आले आणि पालिकेच्या पथकाने वृद्ध महिलेच्या झोपडीची झडती घेतली असता सर्वांना धक्काच बसला. राजौरीच्या नौशेरा येथे भीक मागत असलेल्या वृद्ध महिलेच्या झोपडीत लाखो रुपये दिसले. या पथकाला वयोवृद्ध महिलेच्या झोपडीतून तब्बल 2,60,000 रुपये मिळाले आहेत. न्यूज एजन्सी एएनआयनेही महिलेच्या झोपडीतून मिळालेल्या या रकमेची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, या झोपडीत पैशांचा ढिग फोटांमधून दिसू शकतो. झोपडीतील कचऱ्याच्या डब्यात, तर कुठे लिफाफ्यात पैसे ठेवलेले होते. या पैशाची मोजणी करण्यासाठी पथकाला बराच वेळ लागला.

या घटनेवर वॉर्ड सदस्याने सांगितले की, ही वृद्ध महिला 30 वर्षांपासून येथे राहत होती. काल हे पथक राजौरीहून आले आणि महिलेला वृद्धाश्रमात घेऊन गेले. पालिकेच्या पथकाला झोपडतील एका डब्यात आणि लिफाफ्यांमधील नोटा सापडल्या. ही बातमी पसरताच त्या ठिकाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. भीक मागत असलेल्या वृद्ध महिलेकडे इतके पैसे पाहून प्रत्येकजण अवाक झाला.

jammu kashmir found piles of money in the hut of an elderly beggar woman, people tired of counting pictures viral

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण