जम्मू काश्मीर : यावर्षी खोऱ्यात १७१ दहशतवादी ठार, १९ पाकिस्तानचे, तर १५१ स्थानिक होते


जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री श्रीनगरच्या पंथा चौक भागात चकमक सुरू झाली. आयजींच्या म्हणण्यानुसार, आम्हाला माहिती मिळाली की, जेवान दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले 3 दहशतवादी परिसरात लपले आहेत. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर चकमकीत ३ पोलीस आणि २ सीआरपीएफ जवान जखमी झाले. Jammu and Kashmir 171 militants killed in the Valley this year, 19 Pakistanis and 151 locals


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री श्रीनगरच्या पंथा चौक भागात चकमक सुरू झाली. आयजींच्या म्हणण्यानुसार, आम्हाला माहिती मिळाली की, जेवान दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले 3 दहशतवादी परिसरात लपले आहेत. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर चकमकीत ३ पोलीस आणि २ सीआरपीएफ जवान जखमी झाले.

ते म्हणाले की, सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे. या चकमकीत जेएएम या दहशतवादी संघटनेचे ३ दहशतवादी मारले गेले, त्यापैकी एकाचे नाव सुहेल अहमद राथेर असे आहे. तर दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह इतर साहित्यदेखील जप्त करण्यात आले.

24 तासांत 9 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत गेल्या 24 तासांत एकूण 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कर, सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांनी मिळून या दहशतवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग, कुलगाम आणि पंथा चौक भागात झालेल्या चकमकीत दहशतवादी मारले गेले. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, आम्ही यावर्षी १०० यशस्वी ऑपरेशन्सचे लक्ष्य पूर्ण केले असून त्यात ४४ प्रमुख दहशतवादी मारले गेले आहेत.वर्षभरात 171 दहशतवाद्यांना कंठस्नान

दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहिती मिळाली, त्यावर कारवाई करत सुरक्षा दलांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यावर्षी एकूण 171 दहशतवादी मारले गेले, त्यापैकी 19 पाकिस्तानी आणि 152 स्थानिक दहशतवादी होते. गेल्या वर्षी ३७ नागरिकांचा मृत्यू झाला होता, मात्र यावर्षी ३४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

आयजी म्हणाले की अंमली पदार्थांची प्रकरणे आमच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहेत. 815 एफआयआर नोंदवण्यात आले असून सुमारे 400 आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. या वर्षात एकूण 1465 अटक करण्यात आली आहे. भविष्यात सर्व ड्रग पीडितांची संख्या कमी करण्यासाठी आम्ही डेटाबेस तयार करत आहोत.

Jammu and Kashmir 171 militants killed in the Valley this year, 19 Pakistanis and 151 locals

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण