जगन्नाथाच्या रथ यात्रांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा परवानगी नाकारली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ओडिशातील जगन्नाथपुरी ऐवजी अन्य ठिकाणांवर रथ यात्रांचे आयोजन करण्यास परवानगी मागणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या आहेत. कोरोना संसर्ग काळामध्ये आतापर्यंत हजारो लोकांना प्राण गमवावे लागले असून अशा स्थितीमध्ये आम्ही धोका पत्करू शकत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान मांडले. Jagganath yatra will not happen



राज्य सरकारने कोरोनास्थिती लक्षात घेऊन राज्यात जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यास मनाई केली होती. उच्च न्यायालयाने देखील त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली होती. याबाबत सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा म्हणाले की, ‘‘ मला देखील जगन्नाथ पुरीला जायची इच्छा आहे. मागील दीड वर्षांपासून मला तेथे जाता आलेले नाही. मी दररोज माझ्या घरी पूजा करतो. मी काही या क्षेत्रातील जाणकार नाही. सरकारने याबाबत निर्णय घेतलेला आहे. कोरोनामुळे नेमका कोणाला कसा फटका बसेल हे सांगता येणार नाही. त्यामुळेच आम्ही कोणताही धोका पत्करू शकत नाही. आम्ही ही यात्रा टीव्हीवर पाहायला हवी. आम्हाला माफ करा, आम्ही ही याचिका फेटाळून लावत आहोत.’’

Jagganath yatra will not happen

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात