डॉ. फारूख अब्दुल्लांचा अजब दावा; म्हणाले, “जम्मू – काश्मीरचे भारतात विलिनीकरणच नाही, ३७० कलमाच्या अटीवर भारताला जोडले”


वृत्तसंस्था

श्रीनगर  : ३७० कलमावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्या क्लब हाऊस चॅटचे समर्थन करताना जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी अजब तर्कटी विधान केले आहे. जम्मू – काश्मीरचे भारतात विलिनीकरण झालेच नसल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.J and K did not merged in india but it had joined with certain conditions, claims National Conference chief Farooq Abdullah

दिग्विजय सिंह यांनी क्लब हाऊसमधील चॅटदरम्यान म्हटले की, काँग्रेसची सत्ता आल्यास ते जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० पुन्हा बहाल करण्याचा विचार करतील. काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आले तेव्हा तिथे लोकशाही सरकार नव्हते.तिथे इन्सानियत नव्हती. काश्मीर हे मुस्लीम बहूल असताना हिंदू राजा असणे हे भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक होते. काश्मिरीयतचे प्रतिक होते. त्या काश्मिरितयला ३७० हटवून त्यांनी धक्का लावला आहे, असा दावा दिग्विजय सिंग यांनी केला होता.

या वक्तव्याचे स्वागत करताना डॉ. फारूख अब्दुल्ला म्हणाले, की जम्मू – काश्मीरचे भारतात विलीनीकरण (merged) झालेले नाही. हे राज्य भारतात जोडून घेतले गेले (joined) आणि त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या.

३७० कलम लागू राहील, ही त्यापैकी सर्वांत महत्त्वाची अट होती. सुप्रिम कोर्टाच्या दोन निकालांमध्ये देखील याचा ३७० पर्मनंट फीचर असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. ३७० कलम हटविणे हे काश्मीरी जनतेच्या इच्छेविरोधात घेतलेला निर्णय आहे. दिल्लीतल्या राजकीय सत्ताधाऱ्यांचा तो निर्णय आहे.

त्यांच्या पक्षाची पूर्वीपासूनची भूमिका ३७० कलमाविरोधातच राहिली आहे. पण ती त्यांच्या पक्षाची राजकीय भूमिका आहे. संपूर्ण देशाची भूमिका नाही, असा दावा डॉ. अब्दुल्लांनी केला.

दिग्विजय सिंगांच्या भूमिकेचे मी मनापासून स्वागत करतो. त्यांनी काश्मीरी जनतेचे मनोगत ओळखले आहे. मला आशा आहे, की सरकार देखील ३७० कलम हटविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून ते पुन्हा बहाल करेल आणि काश्मीरी जनतेच्या इच्छेचा आदर राखेल, असे विधान डॉ. अब्दुल्ला यांनी केले.

J and K did not merged in india but it had joined with certain conditions, claims National Conference chief Farooq Abdullah

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था