पी. चिदंबरम यांना राज्यसभेत जाण्यासाठी स्टॅलीन, शरद पवार यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माजी केंद्रीय गृह मंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना राज्यसभेत जाण्यासाठी तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन किंवा शरद पवार यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार आहेत. चिदंबरम यांचा कार्यकाळ संपत असून तामीळनाडूमधून त्यांना राज्यसभेत पाठविण्या इतके बळ कॉँग्रेसकडे नाही.It’s time for P.Chidambaram to convince Stalin, Sharad Pawar for going to Rajya Sabha

कॉँग्रेसने तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्याशी चर्चा केली आहे. स्टालिन यांनी एका जागेवर काँग्रेस उमेदवाराला द्रमुकचा पाठिंबा देऊ, अशी खात्री नेतृत्वाला दिली आहे. यानंतर काँग्रेस नेतृत्वाला निर्णय घ्यायचा आहे की, उमेदवारी कोणाला द्यायची.



तामिळनाडूत येत्या जूनमध्ये ६ जागा रिक्त होत असून, द्रमुककडे ३ आणि अण्णाद्रमुककडे ३ जागा आहेत. द्रमुकने आपली अतिरिक्त मते काँग्रेसला देण्याची तयारी दाखवली आहे.

महाराष्ट्रातही ६ जागा येत्या जुलैमध्ये रिक्त होत आहेत. सध्याच्या गणितानुसार भाजप २, राष्ट्रवादी काँग्रेस १, शिवसेना १ आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने एक जागा जिंकता येईल, अशी स्थिती आहे.

मात्र, शरद पवार आणि चिदंबरम यांचे वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांना राज्यसभेत पाठविले जाईल का याबाबत शंका आहे.महाराष्ट्रात सध्या भाजपाच्या ताब्यात ३ जागा आहेत.

मात्र, भाजपने रणनिती आखून अपक्ष आणि इतर काही पक्षांमध्ये फूट पाडून तिसरी जागा दुसऱ्या क्रमांकाच्या मतांनी जिंकता येईल. आघाडीचे घटक पक्षही असा प्रयत्न करतील की, दुसºया क्रमांकाच्या मतात आघाडीचा उमेदवार जिंकून यावा.

It’s time for P.Chidambaram to convince Stalin, Sharad Pawar for going to Rajya Sabha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात