‘RT-PCR चा रिपोर्ट लवकरात लवकर रूग्णाला देणे बंधनकारक; नंतर सरकारी वेबसाईटवर अपलोड करण्याचे बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश


विशेष प्रतिनिधी

नागपूर : कोरोना चाचणीचा RT-PCR रिपोर्ट आधी रूग्णाला द्या त्यानंतर सरकारी वेबसाईटवर अपलोड करा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मेडिकल लॅब्सना RTPCR चाचण्यांच्यासंदर्भात हे आदेश दिले आहेत. मेडिकल चाचणीचा अहवाल हा व्हाट्स अॅप वर दिला तरीही चालेल मात्र तो आधी रूग्णाला कळवावा. त्यानंतर ICMR म्हणजेच इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्चच्या पोर्टलवर अपलोड करण्यात यावा असं कोर्टाने म्हटलं आहे. It is mandatory to report the RT-PCR to the patient as soon as possibleजस्टिस झेड ए हक आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. रूग्णांची चाचणी झाल्यानंतर त्यांना कोरोनाचा रिपोर्ट मिळण्यास उशीर होतो आहे असं मध्यस्थ डॉ. मुकेश चांडक यांनी सांगितलं. त्यांनी हे देखील कोर्टाला सांगितलं की लॅबमध्ये जेव्हा रूग्ण चाचणीसाठी जातो, तेव्हा त्याला कोरोना चाचणीचा अहवाल लवकर प्राप्त होत नाही. कारण तो रिपोर्ट ICMR च्या पोर्टलवर अपलोड व्हायचा असतो. कधी कधी सर्व्हर डाऊन असतो त्यामुळे हा रिपोर्ट अपलोड होत नाही त्यानंतर तो रूग्णाला मिळतो यामध्ये बराच वेळ जातो असंही चांडक यांनी कोर्टाला सांगितलं. ज्यानंतर कोर्टाने आरटीपीसीआर टेस्टचे रिझल्ट आधी रूग्णाला देण्यात यावेत असा निर्णय कोर्टाने दिला आहे.

कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांनी कोरोना चाचणीचा जो काही अहवाल असेल म्हणजेच रूग्ण जर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तर ते रूग्णाला समजलं पाहिजे. Whatsapp वर कळवलं तरीही हरकत नाही पण ते रिपोर्ट रूग्णाला आधी मिळाले पाहिजेत तसंच या रिपोर्टची हार्डकॉपीही रूग्णाला आधी उपलब्ध करून द्यावी असंही कोर्टाने स्पष्ट केलं. ICMR च्या पोर्टलवर रिपोर्ट अपलोड करणं महत्त्वाचं आहे मात्र तो रूग्णाला आधी मिळाला पाहिजे असंही कोर्टाने म्हटलं आहे.

त्याशिवाय कोर्टाने आणखी एक महत्त्वाचा निर्देश दिला आहे. ज्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत त्या आयसीएमआरच्या पोर्टलवर चोवीस तासांमध्ये अपलोड होणं आवश्यक आहे. तर जे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत ते अपलोड करण्यासाठी ७ दिवस लागले तरीही चालणा आहे असंही कोर्टाने म्हटलं आहे.

It is mandatory to report the RT-PCR to the patient as soon as possible

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर