माध्यमसमूह म्हणजे काय पवित्र गाय आहे की ज्यांना सुरक्षा कवच मिळावे असा सवाल करत माजी संपादकाने वाचला भास्करच्या गैरप्रकारांचा पाढा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माध्यम म्हणजे कोणी पवित्र गाय नाही की ज्यांना सुरक्षा कवच मिळावे असा सवाल करत भास्करच्या माजी संपादकाने भास्कर समुहाच्या गैरप्रकारांचा पाढा वाचला आहे.Is the media sacred cow, asks former editor of Bhaskar

भास्करवर पडलेल्या आयकर विभागाच्या छाप्यांचे समर्थन करत माजी संपादक एल. एन. शितल यांनी भास्कर समूह स्वस्त दरात जमीन संपादन करून फायद्यात विकत आहे. बिल्डर आणि व्यापारी यांच्याशी संगनमत करून ड्युप्लेक्स फ्लॅट्स बनवून विकत आहेत, असा आरोप केला आहे.आयकर विभागाने दैनिक भास्करच्या कार्यालयावर छापा टाकल्याच्या काही तासांनंतर दैनिकाच्या हिंदी आवृत्तीचे माजी संपादक एल. एन. शितल यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, माध्यमसमूह म्हणजे पवित्र गाय नाही, जी एखाद्या गोष्टीची चौकशी करण्यापासून स्वत:ला वाचवू शकते.

आयटी विभाग आणि ईडीने (एन्फोर्समेंट डायरेक्टरेट) केलेल्या कारवाईला स्वतंत्र माध्यमांवर हल्ला म्हणून संबोधले आहे. भास्कर समुहाच्या सत्ताविरोधी वृत्तांकनावर चिडून जाऊन त्यांना धडा शिकविण्यासाठी आणि अन्य माध्यम समुहांना घाबरविण्यासाठी हे छापे घातले आहे. परंतु, असे म्हणणाºयांना हे माहित असायला हवे की दैनिक किंवा न्यूज चॅनल म्हणजे पवित्र गाय नाही ज्यांना सुरक्षा कवच मिळाले आहे

दैनिक किंवा न्यूज चॅनलच्या पडद्याआड काय धंदे चालतात हे कोणालाही समजत नाही. त्यांच्या सगळ्या गैरप्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासही कमी करत नाही. यामध्ये भास्कर समूह तर माहिर आहे. दैनिकाच्या नावाखाली सरकारकडून कवडीमोलाने जमीनी घ्यायच्या आणि त्यानंतर मनाला वाट्टेल त्या पध्दतीने त्यांचा वापर करायचा हा त्यांचा धंदा आहे.

बिल्डरांना हाताशी धरून फ्लॅट बांधायचे आणि व्यापाऱ्यांशी हातमिळवणी करून विक्री वाढविण्यासाठी वाचकांचा वापर भास्कर समुहाने आत्तापर्यंत केला आहे. माध्यम हा जर एक उद्योग आहे तर त्याच्यावर छापा का पडू शकत नाहीत? परंतु त्यावर छापा पडला की काही लोक आरडाओरडा सुरू करतात. म्हणतात की बदला घेण्यासाठी हे केले जात आहे.

एका माध्यमसमुहाची १९९२ मध्ये शंभर कोटी रुपयांचीही उलाढाल नव्हती. आज २०२१ मध्ये हजारो कोटी रुपयांची मालमत्ता आहे. हा चमत्कार कसा झाला हे समजण्यासाठी फार ज्ञानी असण्याची आवश्यकता नाही.

भास्कर स्वत:ला सर्वात मोठा ताकदवान, सगळ्यात मोठा आणि सर्वाधिक निस्पृह समजतो. त्यांच्या आवाजात खूप ताकद आहे, सरकार त्यांच्यासमोर थरथर कापते असे भासविण्याचा प्रयत्न ते करत असतात.

मग आता त्यांना भीती का वाटते आहे? ते विरोधी पक्षाला हाताशी धरून संसदेत गोंधळ घालू शकतात. महागातील महाग वकीलांची फौज सर्वोच्च न्यायालयात उभी करून आपली बाजू मांडू शकतात.

आपल्या वाचक परिवाराच्या ताकदीवर निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करू शकतात. जर ते आकाश-पाताळ एक करू शकतात तर आयकर विभाग आणि ईडीला ऐवढे का घाबरत आहे?

Is the media sacred cow, asks former editor of Bhaskar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था