IPL UAE 2021 Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने यूएई येथे खेळवण्याचे विशेष सर्वसाधारण सभेत (एसजीएम) मंजूर केले आहे. मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शाह यांनी याची पुष्टी केली. त्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो विचारात घेणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. अबू धाबी, शारजाह आणि दुबईच्या 3 मैदानांवर आयपीएल सामने खेळवणार असल्यामुळे यूएईलाही आनंद झाला आहे. IPL UAE 2021 Schedule, Vice President BCCI Rajeev Shukla On Indian Premier League
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने यूएई येथे खेळवण्याचे विशेष सर्वसाधारण सभेत (एसजीएम) मंजूर केले आहे. मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शाह यांनी याची पुष्टी केली. त्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो विचारात घेणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. अबू धाबी, शारजाह आणि दुबईच्या 3 मैदानांवर आयपीएल सामने खेळवणार असल्यामुळे यूएईलाही आनंद झाला आहे.
आयपीएल २०२१ चे सत्र स्थगित झाल्यापासूनच चर्चा होती की, उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये खेळवले जाऊ शकतात. येत्या काही दिवसांत बीसीसीआय अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डांशी परदेशी खेळाडूंसंदर्भातही चर्चा करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. इंग्लिश बोर्डाने यापूर्वीच खेळाडूंवर निर्बंध घातले आहेत.
टी-२० विश्वचषकासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची १ जून रोजी बैठक होणार आहे. विश्वचषक होस्ट करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी बीसीसीआय जूनपर्यंत मुदत मागणार आहे. विश्वचषकासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बोर्ड कोविड-19 च्या स्थितीबद्दलही पुनरावलोकन करणार आहे.
आयपीएल कोरोनामुळे स्थगित झाल्यापासून टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत अनिश्चितता आहे. आयसीसीनेही यूएईला बॅकअप म्हणून पर्यायात ठेवले आहे. अशा परिस्थितीत आयपीएल होस्ट करण्याबरोबरच वर्ल्ड कपचे होस्टिंगदेखील यूएईला देण्यात यावे, यासाठी बोर्ड जूनपर्यंत विचार करू शकते.
IPL UAE 2021 Schedule, Vice President BCCI Rajeev Shukla On Indian Premier League
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App