मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले- दिल्लीत कोरोनाचे केवळ 900 नवीन रुग्ण आढळले, राजधानी आणखी अनलॉक करणार

around 900 corona cases have been reported in delhi in the last 24 hours says cm kejriwal

cm kejriwal : प्राणघातक कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात अद्याप कायम आहे. परंतु आता दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत नवीन रुग्णसंख्या कमी होत आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 900 नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आम्ही आणखी अनलॉक करू. around 900 corona cases have been reported in delhi in the last 24 hours says cm kejriwal


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्राणघातक कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात अद्याप कायम आहे. परंतु आता दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत नवीन रुग्णसंख्या कमी होत आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 900 नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आम्ही आणखी अनलॉक करू.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियमवर लसीकरणाच्या मोहिमेचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया त्यांच्यासमवेत उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, दिल्लीत केसेसची संख्या कमी होणार असल्याने आम्ही अधिक कामांना परवानगी देऊ.

दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काल हळूहळू दिल्ली अनलॉक करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले होते की, आम्ही जनतेच्या आणि तज्ज्ञांच्या सूचनांच्या आधारे एकेका आठवड्याला दिल्लीत लॉकडाऊन हळूहळू उघडण्याची प्रक्रिया सुरू ठेवू.

around 900 corona cases have been reported in delhi in the last 24 hours says cm kejriwal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात