प्रियांका गांधींकडून नानांनी घेतली प्रेरणा; काँग्रेसला प्रत्येक जिल्ह्यात मिळणार महिला कार्याध्यक्ष!!

प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण जागांपैकी 40 टक्के जागा महिला उमेदवारांना देण्याचे जाहीर केले आणि त्याची अंमलबजावणी देखील केली.Inspired by Nana from Priyanka Gandhi

प्रियांका यांच्या या कार्यातून प्रेरणा घेत नाना पटोले यांनी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नेमण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे काँग्रेसच्या राजकीय निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढेल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात महिलांना 40 % उमेदवारी देण्याचे नुसते जाहीरच केले नाही, तर त्याची अंमलबजावणी केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 125 उमेदवारांपैकी 50 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईचाही समावेश आहे. त्याच बरोबर बिकनी गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अर्चना गौतम हिला देखील काँग्रेसने हस्तिनापुर मधून तिकीट दिले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या निवडणूक नसली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 % महिलांना उमेदवारी देण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नेमण्यात येईल, असे नाना पटोले यांनी जाहीर केले आहे.

Inspired by Nana from Priyanka Gandhi

महत्त्वाच्या बातम्या