मुख्यमंत्री चन्नी यांनी प्रियांका गांधींना ब्रीफिंग देण्याचा संबंधच काय?, संबित पात्रा यांचा सवाल- प्रियांका कोणत्या घटनात्मक पदावर?

What has CM Channy got to do with briefing Priyanka Gandhi? BJPs allegation, asks- in which constitutional position Priyanka Gandhi

Priyanka Gandhi : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत कमालीचे राजकारण होत आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची माहिती देताच, भाजपने हल्लाबोल केला आहे. What has CM Channy got to do with briefing Priyanka Gandhi? BJPs allegation, asks- in which constitutional position Priyanka Gandhi?


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत कमालीचे राजकारण होत आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची माहिती देताच, भाजपने हल्लाबोल केला आहे.

संबित पात्रा म्हणाले की, सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची माहिती दिली. का? प्रियांका कोणत्या घटनात्मक पदावर आहेत? पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत त्यांना का सांगण्यात आले? यावर गांधी घराण्याने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी आमची ठाम मागणी आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत बोलताना सीएम चन्नी म्हणाले की, पंजाबमध्ये त्यांना कोणताही धोका नाही, ते येथे सुरक्षित आहेत. चन्नी म्हणाले की, मी या संदर्भात प्रियांका गांधींशी बोललो आहे आणि त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. चन्नी यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते भडकले.

याआधी राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी रात्री ट्विट करून या प्रकरणाला आणखी हवा दिली होती. सीएम चरणजीत सिंह चन्नी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वक्तव्यावर ट्विट करत पंतप्रधान मोदींचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली.

सीएम चन्नी यांनी काय ट्विट केले‌?

सीएम चरणजीत सिंह चन्नी यांनी ट्विटमध्ये सरदार पटेल यांचा हवाला देत लिहिले, “ज्याला कर्तव्यापेक्षा जिवाची जास्त काळजी असते, त्याने भारतासारख्या देशात मोठी जबाबदारी घेऊ नये – सरदार वल्लभभाई पटेल.”

What has CM Channy got to do with briefing Priyanka Gandhi? BJPs allegation, asks- in which constitutional position Priyanka Gandhi?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात