ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी बॉक्सर लवलीना झाली डीएसपी


 

आगामी काळात लवलीना ही हिंदुस्थानी पोलीस सेवेत एक दिवस एपीएस व आयपीएस पदापर्यंत नक्की पोहोचेल,असा विश्वास मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी व्यक्त केला.Olympic bronze medalist boxer Lovelyna became DSP


विशेष प्रतिनिधी

दिसपूर : टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सर लवलीना हिने कास्यपदक जिंकून देशाचा तिरंगा फडकावला. बुधवारी बॉक्सर लवलीनाला आसाम पोलीसमध्ये पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदी नियुक्ती देऊन सन्मानित करण्यात आले.आगामी काळात लवलीना ही हिंदुस्थानी पोलीस सेवेत एक दिवस एपीएस व आयपीएस पदापर्यंत नक्की पोहोचेल,असा विश्वास मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी व्यक्त केला.


“सिंधूस्तान” ! पी.व्ही.सिंधू आणि लवलिनच्या दमदार विजयानंतर दोघींच्याही वडिलांच्या ‘बाप’ प्रतिक्रिया


आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जनता भवन, दिसपूर येथे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून लोव्हलिना यांना नियुक्ती पत्र दिले.ऑलिम्पिकनंतरच मुख्यमंत्र्यांनी त्यांना डीएसपी बनवण्याची चर्चा केली होती.मुख्यमंत्र्यांनी लोव्हलिनाच्या नावाने रस्ता आणि त्यांच्या गावी एक स्टेडियम बांधण्याची घोषणाही केली होती.

ऑलिम्पिक इतिहासात पदक जिंकणारी लोव्हलिना ही दुसरी भारतीय महिला बॉक्सर ठरली.एवढेच नाही तर १२५ वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात पदक जिंकणारी ती आसामची पहिली अॅथलीट आहे.हा सन्मान मिळाल्याबद्दल भावनिक झालेल्या लवलीनाने पोलीस विभागाचे आभार मानले.आसाम सरकारकडून लवलीनाला मासिक वेतनाबरोबरच प्रशिक्षणासाठी दर महिन्याला एक लाख रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

Olympic bronze medalist boxer Lovelyna became DSP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात