देशातील १४ राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला असून, आतापर्यंत एकूण २२० रुग्ण आढळून आले आहेत. Infiltration of the Omicron variant of the Corona in 14 states of the country; Center restricts all crowded events including wedding night curfew
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येईल, असा इशारा दिला जात आहे.ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे.आतापर्यंत देशातील १४ राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला असून, आतापर्यंत एकूण २२० रुग्ण आढळून आले आहेत.
यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे राज्यांना हे पत्र पाठवलं आहे. लग्न समारंभासह गर्दी होणाऱ्या सर्वच कार्यक्रमातील उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्याचा सल्ला केंद्राने दिला असून, त्यामुळे लग्न समारंभासह सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता वाढली आहे.
कोरोना चाचण्या वाढवून परिस्थितीवर लक्ष्य ठेवण्याबरोबरच रात्रीची संचारबंदी, गर्दी होणाऱ्या मोठ्या सभांवर बंदी, लग्न आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मर्यादीत लोकांना परवानगी आदी उपाययोजना करण्यात याव्यात, असं या पत्रात म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App