WINTER SESSION:आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; त्यापूर्वीच 8 जणांना कोरोनाची लागण ; अध्यक्ष निवडीसाठी भाजप कॉंग्रेस आक्रमक


 •  महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत आजपासून 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे
 • हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे.
 • दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होणार आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन  आजपासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित असतील. तत्पूर्वीच ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याने अधिवेशनात चोख उपाययोजना करण्यात आल्या आहेत. Maharashtra MLS Winter Session

आज अधिवेशन

 • त्यापूर्वीच 8 जणांना कोरोनाची लागण,
 • आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांचा घेतला आढावा
 • ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सभापतींकडून सूचना
 •  एकूण 2678 जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली त्यापैकी ८ जणांची चाचणी सकारात्मक आली
 • लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटी-पीसीआर चाचणी विधान भवन प्रवेशासाठी बंधनकारक
 • अधिवेशन कालावधीत गर्दी होऊन संसर्ग वाढू नये यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नसून स्वीय सहायकांसाठी बसण्याची व्यवस्था विधान भवनासमोरील वाहनतळ आवारात स्वतंत्र मंडप टाकून करण्यात आली
 •  मंत्र्यांच्या आस्थानपनेवरील कर्मचारी यांना देखील अत्यंत मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येत आहे

पत्रकार परिषद

विधिमंडळ अधिवेशनापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर देखील बहिष्कार टाकला होता. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षण, महिला सुरक्षा, नोकर भरती गोंधळ, आरोग्य भरती गोंधळ, महावितरणकडून करण्यात येणारी सक्तीची वसुली या प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारकडून विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील आज पार पाडली जाईल.कायदा सुव्यवस्थेबाबत भाजप आक्रमक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन, विधानसभा अध्यक्षांची आवाजी पद्धतीनं निवड, ओबीसी राजकीय आरक्षण, महावितरणकडून सुरु असलेली सक्तीची वीज बिल वसुली, पेट्रोल डिझेलवरील कर कमी न करणं, दारुवरील कर कमी करणं, महिला सुरक्षा, कायदा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न, कोरोना काळातील भ्रष्टाचार यावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळं आज विधिमंडळात भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

विधानसभा अध्यक्षाची निवडीवर कॉंग्रेस आक्रमक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी राजीनामा देत पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानं हे पद रिक्त आहे. गेल्या अधिवेशनाचं कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाहिलं. तर, काँग्रेस देखील या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आक्रमक झाली आहे.

Maharashtra MLS Winter Session

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण