PAKISTAN : इशनिंदेला फाशीची शिक्षा ? कराची (पाकिस्तान) येथे धर्मांधांकडून पुन्हा हिंदूं मंदिराची -मूर्तींची तोडफोड-२२ महिन्यात ९ मंदिरांवर आक्रमणे


  • परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांनी हा विषय जागतिक स्तरावर न्यावा, अशी भाजपचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांची मागणी
  • गेल्या अनेक वर्षांपासून पाकमध्ये हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे केली जात आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कराची (पाकिस्तान) येथील नारायण पुरामधील रणछोड लाइन विभागात एका हिंदु मंदिरात दोघा धर्मांधांनी प्रवेश करून हातोड्याने दुर्गादेवीच्या दोन मूर्तींची तोडफोड केली, तसेच मंदिराचीही हानी केली. Fanatics vandalize Hindu temples and idols again

हिंदूंनी घटनास्थळीच दोघा धर्मांधांपैकी महंमद वलिद याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याविरोधात ईशनिंदेचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तोडफोडीची माहिती मिळताच येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. तोडफोडीनंतर आंदोलन करण्यात आले. हिंदूंनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

या वेळी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेच्या काही आठवड्यांपूर्वी सिंधमध्ये एका मंदिराची तोडफोड करून तेथील संपत्ती चोरून नेण्यात आली होती. पाकमध्ये गेल्या २२ मासांमध्ये मंदिरांवर आक्रमण होणारी ही ९ वी घटना आहे.

भाजपचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी मंदिराच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत म्हटले आहे, ‘कराचीमध्ये मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. ‘मंदिर प्रार्थनास्थळ होण्यास पात्र नाही’, असे सांगून आक्रमणकर्त्यांनी तोडफोडीचे समर्थन केले.

हे पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदूंविरुद्ध राज्य-समर्थित आतंकवादी कृत्य आहे.’मल तसेच सिरसा यांनी परराष्ट्र मं त्री एस्. जयशंकर यांना पाकिस्तानातील हिंदू आणि शिख यांच्या धर्मस्वातंत्र्याला पाठिंबा देण्यासाठी जागतिक स्तरावर हा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली आहे.

Fanatics vandalize Hindu temples and idols again

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात