भारताच्या सर्जीकल स्ट्राईकचा धसका, म्यानमारच्या लष्कराने स्वत;हून कारवाई करत भारतविरोधी बंडखोरांना दिले भारताच्या ताब्यात


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आसाम रायफल्सचे कमांडिग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह त्यांचा चिमुकला मुलगा आणि पत्नीच्या मृत्यूचा बदला भारताने घेतला आहे. भारताच्या सर्जीकल स्ट्राईकचा धसका घेऊन म्यानमारच्या लष्कराने स्वत:हून भारतविरोधी बंडखोरांवर कारवाई केली आणि त्यांना भारताच्या ताब्यात दिले.India’s surgical strike thwarts, Myanmar army takes action against anti-India rebels

म्यानमारमधील लोकशाहवादी नेत्या आँग स्यु की यांच्याविषयी भारतातील अनेकांना प्रेमाचा उमाळा येतो. मात्र, त्यांच्याच काळात म्यानमारमध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या बंडखोरांचा उपद्रव वाढला होता. मात्र, आता म्यानमारमध्ये सत्तेवर आलेल्या लष्करी प्रशासनाने या बंडखोरांवर कारवाई सुरू केली आहे.यामागे मोदी सरकारची सर्जीकल स्ट्राईकची भीतीही आहे. कारण यापूर्वी लष्कराच्या डोग्रा कंपनीवर हल्ला करून २० जवांनाची हत्या करणाºया बंडखोरांवर भारतीय लष्कराने सर्जीकल स्ट्राईक केला होता. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची त्यामध्ये महत्वाची भूमिका होती. त्यामुळे कर्नल विप्लव त्रिपाठी यांची कुटुंबासह हत्या झाल्यावर त्याचा बदला भारत घेणारच याची म्यानमारला कल्पना होती.

म्यानमार सैन्याकडून त्यांच्या जमिनीवरुन भारतविरोधी बंडखोर कारवाया करणाºया गटांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. म्यानमारमध्ये छावणी उभारुन भारतविरोधी कारवाया करणाºया बंडखोर गटांवर म्यानमारच्या लष्कराने सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली आहे.

भारतीय यंत्रणाही म्यानमारमधील सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी पिपल्स लिबरेशन आर्मीकडून आसाम रायफल्सचे कर्नल आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पीएलएफ तसेच यासारख्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी भारतीय यंत्रणा म्यानमारमधील यंत्रणांच्या संपर्कात आहेत.

त्यांनी भारताविरोधी बंडखोरांना भारतीय यंत्रणांकडे सोपवण्यात आलं आहे. विशेष विमानाने पाच बंडखोरांना भारतात आणण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे.४६ आसाम रायफल्सचे कमांडिग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह त्यांचा मुलगा,

पत्नी आणि इतर चार जवानांना भारत-म्यानमार सीमेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता. याआधी भारताने डोग्रा रेजिमेंट बटालियचे २० जवान हल्ल्यात शहीद झाल्यानंतर म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता.

India’s surgical strike thwarts, Myanmar army takes action against anti-India rebels

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”