लसीकरणात पुन्हा कोटीची झेप: ११ दिवसांमध्ये तीनदा १ कोटींहून अधिक डोस; एकट्या यूपीत तब्बल ३० लाखांहून अधिक!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताने कोरोनाविरोधी लसीकरणात आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ११ दिवसात देशाने एकदा नव्हे तर तीन वेळा १ कोटींहून अधिक लोकांचे लसीकरणाचा विक्रम केला आहे.India’s record in vaccination campaign; More than one crore doses were given to the citizens three times in 11 days

केंद्र सरकारतर्फे देशभरात विविध राज्यात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हक्सींन लसीचे डोस मोफत दिले जात आहेत. शिवाय ते खासगी रुग्णालयात विकतही घेतले जाऊ शकतात.



अनेक नागरिकांनी एक तर अनेकांनी दोन डोस घेतले आऊन स्वतःला सुरक्षित करून घेतले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. पण, तिसऱ्या लाटेचा धोका असण्याची शक्यता आहे. तसे इशारे वारंवार देण्यातही आले आहेत. तसेच लसीकरण हाच कोरोनापासून बचाव करण्याचा हा एकमेव उपाय आहे. तसेच ती काळाची गरज असल्याने केंद्र सरकारने लसीकरण मोहीम सुरूच ठेवली आहे.

त्या अंतर्गत लसीकरणाचा धडाका उडवून दिला आहे. विशेष म्हणजे लसीकरणासाठी नागरिकही पुढाकार घेत आहेत. त्यामुळे ६ सप्टेंबर अखेर ६९ कोटी लसीचे डोस दिले आहेत.

India’s record in vaccination campaign; More than one crore doses were given to the citizens three times in 11 days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात