वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीचा अदानी समूहाबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूह राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला. शेअर बाजारात पडझड झाली. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. अदानी समूहाला बडी कर्जे देणाऱ्या बँकांकडे रिझर्व्ह बँकेने या कर्जांचे सर्व तपशील मागवले आहेत. त्या संदर्भात हा खुलासा असून भारतीय बँकिंग क्षेत्र स्थिर असल्याचे रिझर्व बँकेने या खुलाशात नमूद केले आहे. India’s banking sector stable; Following Finance Minister Sitharaman, Reserve Bank also disclosed
१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा
मोठ्या कर्जांसंदर्भात बँकांचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची स्वतःची सेंट्रल रेपोझिटरी इन्फॉर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट्स अशी व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेद्वारे बँकांची मोठी कर्जे कशी, कुठे दिली जातात? त्याचा परतावा कसा मिळतो? यावर विशेष लक्ष ठेवले जाते. अदानी समूहाच्या कथित अनियमिततेच्या बातम्या आल्यानंतर या समूहाला कर्ज दिलेल्या सर्व बँकांना संबंधित कर्जाची माहिती देण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने काढले होते. या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने भारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर असल्याचा आणि बँकांना कोणतेही नुकसान झाले नसल्याचा खुलासा केला आहे.
अदानी समूहाचे मूल्यांकन घटून शेअर बाजारात जरी पडझड झाली असली तरी बँकांचे अथवा भारतीय आयुर्विमा अर्थात एलआयसीचे नुकसान झालेले नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाचे देखील नुकसान झालेले नाही. या दोन्ही संस्था नफ्यात आहेत, असा खुलासा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधीच केला होता. त्यांच्या या खुलाशावर रिझर्व्ह बँकेने केलेल्या खुलाशातून शिक्कामोर्तब झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App