7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य


प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यात कररचनेमध्ये झालेल्या बदलाबाबत मोठी घोषणाही करण्यात आली. हे सर्व सुरु असतानाच सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात आणखी एक बातमी समोर आली आहे. 7 th Pay Commission : Variation of 1 % possible in dearness allowance of government employees

जवळपास 65 लाख कर्मचारी आणि 48 लाख निवृत्तीवेतनाचे लाभार्थी यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यासंदर्भात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चर्चा होणार आहे.

रोजगार मंत्रालयाकडून AICPI इंडेक्सच्या आकडेवारीमध्ये नोव्हेंबर महिन्यानंतर घट झाली आहे. ज्याचे थेट परिणाम DA होणा-या वाढीवर होणार आहेत. 2022 या वर्षांमध्ये जुलै महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत AICPI इंडेक्समध्ये सातत्याने वाढ होत होती. पण, डिसेंबर महिन्यात मात्र परिस्थिती बिघडल्याचे लक्षात आले आहे. ज्यामुळे 1 जानेवारीपासून महागाई भत्त्यामध्ये होणारी अपेक्षित वाढ कमी असू शकते. जिथे ऑक्टोबर महिन्यात AICPI इंडेक्सचा आकडा 132.5 इतका होता तिथे तो डिसेंबरमध्ये मात्र 132.2 वर पोहोचला.

केंद्र सरकारने 31 जानेवारीलाच AICPI इंडेक्सची आकडेवारी जाहीर केली आहे. ज्यामुळे आता Labour Ministry च्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारे कर्मचा-यांच्या डीएमध्ये होणारी 4 % टक्के वाढ 3 % वरच थांबू शकते. थोडक्यात कर्मचाऱ्यांचे 1 % नुकसान होणार आहे.

7 th Pay Commission : Variation of 1 % possible in dearness allowance of government employees

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”