१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा


प्रतिनिधी

मुंबई : १९९१ मध्ये जेव्हा भारतात आर्थिक मंदी आली, तेव्हा केवळ १५ दिवस पुरेल इतकीच परकीय गंगाजळी आपल्याकडे शिल्लक होती. अशावेळी या संकटातून मनमोहन सिंह यांनी नव्हे, तर रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर एस. व्यंकटरमण यांनी भारताला तारले, असा महत्त्वपूर्ण खुलासा माहिती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केला आहे. Former rbi governor s. Venkitraman saved India from economic crisis in 1991, says dr. Narendra jadhav

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अर्थसंकल्प विश्लेषण’ सत्रात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाहक राजेंद्र वराडकर, सहकार्यवाहक स्वप्नील सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


पंतप्रधान मोदींची लसीकरणाची मोठी घोषणा; १५ ते १८ वयाच्या मुलांना लस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोसही


डॉ. जाधव म्हणाले की, रिझर्व्ह बँक ही एक अशी संस्था आहे, जिच्यामुळे भारताचा आर्थिक डोलारा टिकून आहे. वेळोवेळी आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे कार्य ती करीत आहे. अशीच एक घटना १९९१ मध्ये घडली. त्यावेळी भारतावरील आर्थिक मंदीचे संकट गडद झाले होते. केवळ १५ दिवस पुरेल इतकी परकीय गंगाजळी शिल्लक होती. त्यामुळे आपण डिफॉल्टर लिस्टमध्ये जाण्याच्या रांगेत होतो. परिणामी जगातला कुठलाही देश आपल्याला कर्ज कर्ज द्यायला तयार नव्हता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक कर्ज नाकारत होते. त्यामुळे आपल्याकडे पैसे उभे करण्याचा कोणताही दुसरा स्रोत उरला नव्हता.

त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर एस. व्यंकटरमण यांनी सोने गहाण ठेवून पैसे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे भारत आर्थिक संकटातून तरला आणि राज्यकर्त्यांचे डोळेही उघडले. त्यानंतर मनमोहन सिंह अर्थमंत्री म्हणून आले. मधल्या काळात तीन – चार महिने गेले आणि जुलै महिन्यात त्यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला. तो ऐतिहासिक ठरला होता, अशी माहिती डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली.

पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग या जोडगोळीला भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक मानले जाते. या दोन्ही नेत्यांनी त्यावेळची काँग्रेस अंतर्गत आणि काँग्रेस बाह्य राजकीय आव्हाने परतवून भारताला आर्थिक संकटातून वाचवले अशी मान्यता आहे. मात्र डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासारख्या नाणावलेल्या अर्थशास्त्रज्ञाने भारताला आर्थिक संकटातून वाचविण्याचे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांच्यापेक्षा रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर व्यंकटरमण यांना दिले आहे. या घटनेला ऐतिहासिक सत्य नोंदीच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.

Former rbi governor s. Venkitraman saved India from economic crisis in 1991, says dr. Narendra jadhav

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”