Indian Railways : तुमच्याकडे तिकीट नसेल तरी आता नो टेन्शन ; काय आहे खास नियम


 

ट्रेनमध्ये सीट रिकामे नसल्यास तिकिट तपासणीस तुम्हाला रिझर्व्ह सीट देण्यास मनाई करू शकतो.Indian Railways: No tension now even if you don’t have a ticket; What is the special rule


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आता रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे तिकीट नसेल, तरी आता टेन्शन घेण्याची गरज नाही. रेल्वेनं यासाठी एक खास नियम तयार केला आहे.ज्यामुळे तुम्ही विना तिकीट टेन्शन फ्री प्रवास करु शकता.तुम्ही ट्रेनने विना रिझर्व्हेशनदेखील प्रवास करू शकता.

जर तुम्हाला अचानक प्रवास करावा लागला, तर घाबरण्याची आवश्यकता नाही. पूर्वी अशा परिस्थितीत तत्काळ तिकिटाचाच पर्याय होता. मात्र त्यातही तिकिट मिळणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत एक असा पर्याय किंवा नियम आहे ज्याचा वापर करून तुम्ही विना रिझर्व्हेशनदेखील प्रवास करू शकता.ट्रेनमध्ये सीट रिकामे नसल्यास तिकिट तपासणीस तुम्हाला रिझर्व्ह सीट देण्यास मनाई करू शकतो.


‘भारत गौरव’ ट्रेन सुरू होणार , खासगी सेवेतून ट्रेन चालवण्यात येतील,देशातील पर्यटनाला मिळणार चालना ; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा


मात्र तो तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही. तुमच्याकडे जर रिझर्वेशन नसेल तर अशा परिस्थितीत प्रवाशाकडून २५० रुपये दंडासह तुमच्या प्रवास स्थळाच्या भाड्याएवढे भाडे देऊन तिकिट बनवून घ्या.प्लॅटफॉर्म तिकिटाचा वापर करून प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात.

याशिवाय प्रवाशाला त्या स्टेशनहून भाडे भरावे लागले जिथून त्याने प्लॅटफॉर्म तिकिट घेतले आहे. भाडे वसूल करताना डिपार्टर स्टेशनदेखील त्याच स्टेशनला समजले जाईल. शिवाय तुम्ही ज्या डब्यातून प्रवास करत असाल त्याच डब्याच्या श्रेणीचे भाडे द्यावे लागेल.

Indian Railways: No tension now even if you don’t have a ticket; What is the special rule

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण