योगेश काथुनियाला टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये थाळीफेकमध्ये रौप्यपदक ; भारताची आणखी एक चमकदार कामगिरी


वृत्तसंस्था

टोकियो : टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये थाळीफेकमध्ये भारतीय खेळाडू योगेश काथुनियाने ऐतिहासिक कामगिरी केली असून रौप्यपदक पटकावले आहे. स्पर्धेतील हे तिसरे पदक भारताला काथुनियाच्या कामगिरीने प्राप्त झाले आहे. Indian discus thrower Yogesh Kathuniya pulls off a surprising effort to win the Silver medal in Tokyo Paralympics on Monday in the Men’s F56 category.

काल टेबल टेनिसपटू भवानी पटेलने रौप्यपदक

पटकावून भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. त्यानंतर नेमबाजीत अवनी लेखराने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक आहे.
काथुनियाला या स्पर्धेत ८ खेळाडूंच्या आव्हानांचा सामना करावा लागला.



पुरुष एफ ५६ या गटात त्याने ही अतुलनीय कामगिरी केली. ४४.३८ मीटर लांब त्याने थाळी फेकली. त्यासाठी त्याला सहा वेळा प्रयत्न करावे लागले. दुसऱ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे ४२.८४ ,४३.५५ मीटर लांब थाळी फेकली.
ब्राझीलच्या कॅलौदिनी डॉस संटोसने ४५.५९ मीटर लांब थाळी फेकून सुवर्णपदक मिळवले आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल कॉलेजमधून त्याने बीकॉम केले आहे. त्याचे वडील माजी लष्करी अधिकारी आहेत.

योगेश काथुनियाला २०१७ मध्ये थाळीफेक खेळाची आवड निर्माण झाली. त्याची आई मीनादेवी यांनी त्याला ता खेळात प्रोत्साहन दिले. दिव्यांग असूनही अतिशय खडतर परिश्रमातून त्याने पदक मिळवून भारताचे नाव उज्जल केले आहे. यापूर्वी त्याने २०१८ मध्ये अशियन पॅरा गेममध्ये चौथे स्थान मिळविले होते.

Indian discus thrower Yogesh Kathuniya pulls off a surprising effort to win the Silver medal in Tokyo Paralympics on Monday in the Men’s F56 category.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात