अंतिम फेरीत चिनी खेळाडूवर मात करून २४९.६ गुणांसह सुवर्णपदक
वृत्तसंस्था
टोकियो : पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. अवनी लेखराने सोमवारी पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २२९.१ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. Tokyo Paralympics India Avani Lekhara Wins Gold Medal In Women 10m Ar Standing Sh1final
याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ गुण मिळवत सुवर्ण पटकावले.
अवनीला अंतिम फेरीमध्ये चीनची नेमबाजाने कडवी लढत दिली होती. पण नंतर अवनीने अचूक लक्ष साधत तिचा पराभव केला. चीनची महिला नेमबाज झांगने २४८.९ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आणि रौप्य पदक पटकावले.
अवनी लेखरा ११ वर्षांची असताना, तिचा अपघातात झाला होता. या अपघातात तिला पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, ज्यामुळे तिला अर्धांगवायू झाली. जयपूर, राजस्थानची येथे राहणारी, अवनीची महिलांच्या १० मीटर एअर स्टँडिंग शूटिंगच्या एसएच१ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानावर आहे. अवनीला तिच्या वडिलांनी पॅरा स्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले होते. अवनीने नेमबाजी आणि तिरंदाजी या दोन्हीमध्ये खेळांमध्ये रस दाखवला होता. पण शेवटी तिने नेमबाजीमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले.
Phenomenal performance @AvaniLekhara! Congratulations on winning a hard-earned and well-deserved Gold, made possible due to your industrious nature and passion towards shooting. This is truly a special moment for Indian sports. Best wishes for your future endeavours. — Narendra Modi (@narendramodi) August 30, 2021
Phenomenal performance @AvaniLekhara! Congratulations on winning a hard-earned and well-deserved Gold, made possible due to your industrious nature and passion towards shooting. This is truly a special moment for Indian sports. Best wishes for your future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2021
– पंतप्रधानांनी केलं कौतुक
“विलक्षण कामगिरी अवनी लेखरा! तुझा मेहनती स्वभाव आणि नेमबाजीची आवड यामुळे हे शक्य झाले. सुवर्ण जिंकल्याबद्दल अभिनंदन. भारतीय खेळांसाठी हा खरोखरच एक खास क्षण आहे. तुझ्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Tokyo Paralympics: Shooter Avani Lekhara becomes first Indian woman to win gold at Games Read @ANI Story | https://t.co/vU3cjOzCfx#TokyoParalympics #AvaniLekhara pic.twitter.com/r3fOctSx9j — ANI Digital (@ani_digital) August 30, 2021
Tokyo Paralympics: Shooter Avani Lekhara becomes first Indian woman to win gold at Games
Read @ANI Story | https://t.co/vU3cjOzCfx#TokyoParalympics #AvaniLekhara pic.twitter.com/r3fOctSx9j
— ANI Digital (@ani_digital) August 30, 2021
टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवस भारतासाठी तिहेरी पदककमाईचा ठरला. यामध्ये दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. पण तिने ऐतिहासिक रौप्यपदकावर मोहोर उमटवली. उंच उडीपटू निशाद कुमारने २.०६ मीटर अंतरावर झेप घेत रौप्यपदक कमावले. तर थाळीफेकपटू विनोद कुमारने कांस्यपदक जिंकले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App