वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ओमायक्रोन या घातक विषाणूच्या विषाची परीक्षा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला पाठविण्याचा चंग भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने बांधल्याचे वृत्त आहे. Indian cricket team to South Africa to test for omecron poisoning
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईत झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच दौरा होईल, असे बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
भारतीय संघ ३ डिसेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळल्यानंतर ८ किंवा ९ डिसेंबर रोजी जोहान्सबर्गकडे चार्टर्ड विमानाने रवाना होईल. द. आफ्रिकेत सुरक्षित बायोबबलमध्ये खेळाडूंचे वास्तव्य असेल,अशी ग्वाही देखील धुमल यांनी दिली. भारत-द. आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे पहिली कसोटी १७ डिसेंबरपासून रंगणार आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना धुमल म्हणाले,‘ क्रिकेट दक्षिण आफ्रिका धोकादायक विषाणूविरुद्ध लढा देत असताना आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दुसरीकडे खेळाडूंच्या सुरक्षेशी देखील समझोता होणार नाही. सध्या वेळापत्रकानुसारच चार्टर्ड विमानाने संघ पाठविणार आहोत. खेळाडू तेथे बायोबबलमध्ये वास्तव्य करतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App