Jaishankar On Khalistan: ‘आता तो भारत नाही जो तिरंग्याचा अपमान सहन करेल’, ब्रिटनमधील ‘त्या’ घटनेवर जयशंकर यांची तिखट प्रतिक्रिया

”…जर त्यांनी सुरक्षा दिली नाही तर भारतातूनही प्रतिक्रिया येईल.” असंही जयशंकर म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी (०२ एप्रिल) ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयाबाहेर वारिस पंजाब दे प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्या समर्थनाथ तिरंगा ध्वज हटवल्या गेल्याच्या घटनेवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते म्हणाले की, आता असा भारत आहे की जो तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही. India will not tolerate tricolor flag insult  Jaishankars sharp reaction on Britain incident

जयशंकर यांनी ब्रिटनलाही सुनावले –

यासोबतच ते ब्रिटनबद्दल म्हणाले, “आम्ही अगदी स्पष्ट आहोत, की हे दूतावास ज्या देशात आहेत, त्यांना यास सुरक्षा पुरवायची आहे, ही त्या देशाची जबाबदारी आहे. शेवटी, आम्हीदेखील अनेक परदेशी दूतावासांना सुरक्षा देतो. जर त्यांनी सुरक्षा दिली नाही तर भारतातूनही प्रतिक्रिया येईल. हा तो भारत नाही जो आपला राष्ट्रध्वज खाली खेचलेला सहन करेल.

तसेच ते पुढे म्हणाले, “आमच्या उच्चायुक्तांनी पहिली गोष्ट केली की त्यांनी एक मोठा ध्वजही मागवला आणि तो इमारतीच्या अगदी वर ठेवला. हा केवळ त्या तथाकथित खलिस्तानींसाठी संदेश नव्हता, तर तो ब्रिटीशांनाही एक संदेश होता की हा आमचा ध्वज आहे आणि जर कोणी त्याचा अनादर करण्याचा प्रयत्न केला, तर मी तो आणखी मोठा करेन.’’ जयशंकर म्हणाले, “त्याचा अर्थ असा आहे की, आज एक वेगळा भारत आहे, एक असा भारत जो अत्यंत जबाबदार आणि अत्यंत दृढनिश्चयी आहे.”

India will not tolerate tricolor flag insult  Jaishankars sharp reaction on Britain incident

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात