CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार; आमदार, खासदारांसह घेणार प्रभू रामाचं दर्शन!

CM Shinde aayodhya

”अयोध्या आमच्यासाठी भावना श्रद्धेचा विषय आहे, याकडे आम्ही राजकारण म्हणून बघत नाही.”, असंही मुख्यमंत्री शिदेंनी सांगितलं आहे.

विशेष प्रतिनिधी

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. येत्या 9 एप्रिल रोजी ते अयोध्येला जाणार आहेत. यावेळी ते पक्षाच्या आमदार, खासदार व नेत्यांसह रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबाब माहिती जाहीर केली आहे.  Chief Minister Eknath Shinde will visit Ayodhya on April 9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अयोध्येतील राम मंदिराचे बाळासाहेबांचे स्वप्न होते, ते पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून आम्ही सागाची लाकडे मंदिरासाठी पाठवली आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी चांदीची वीट पाठवली होती. त्यामुळे अयोध्या आम्हाला श्रद्धेचा विषय आहे.

शिवसेन पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौरा होणार असून, मंदिर निर्माणाधीन भागातही आम्ही भेट देणार आहोत. शरयू नदीवर आरती करणार आहोत. आम्ही या विषयाकडे राजकारण म्हणून पाहिलं नाही आणि पाहणार सुद्धा नाही.

Chief Minister Eknath Shinde will visit Ayodhya on April 9

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात