यासोबतच नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व हा धडाही काढून टाकण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने (यूपी सरकारने) यूपी बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. खरंतर आता शाळांमध्ये मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये, इयत्ता बारावीमध्ये शिकवल्या जाणार्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघल प्रकरण काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय अकरावीच्या पुस्तकातून Rise of Islam, Clash of Cultures, Industrial Revolution, Beginning of Time हे धडे काढण्यात आले आहेत. Yogi governments big decision A student from Uttar Pradesh does not come to learn Mughal history
2023-24 या शैक्षणिक सत्रात इंटरमिजिएटमध्ये शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातील ‘भारतीय इतिहासाचे काही विषय-II’मधून शासक आणि मुघल दरबार काढण्यात आला आहे. यासोबतच नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व आणि शीतयुद्धाचा धडाही काढून टाकण्यात आला आहे.
West Bengal Violence: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार ; भाजप खासदाराच्या कार्यक्रमात जाळपोळ आणि दगडफेक
यूपी सरकारचा हा निर्णय शैक्षणिक सत्र 2023-24 पासून लागू करण्यात येत आहे. इतिहासाच्या पुस्तकाशिवाय इतर विषयांतही हा बदल दिसून आला आहे. बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात मुघलांचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे.
यापूर्वी, इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात ‘भारतीय इतिहास-II चे काही विषय’ ते राज्यकर्ते आणि मुघल दरबारापर्यंतचे प्रकरण होते, जे तुम्हाला आता दिसणार नाहीत. यासोबतच इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल करताना इस्लामचा उदय, औद्योगिक क्रांती, संस्कृतींचा संघर्ष आणि काळाची सुरुवात हे प्रकरणही इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App