भारताने आतापर्यंत परदेशात पाठवले लशीचे पावणेसात कोटी डोस, आंतरराष्ट्रीय करारांनुसारच निर्यात


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – भारताने ११ मेपर्यंत विदेशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचे सुमारे ६ कोटी ७० लाख डोस पाठवल्याचे आणि यातील बहुतांश, म्हणजे ८४ टक्के लशींची विक्री केली. मात्र भारताला हे सर्व आंतरराष्ट्रीय करारांनुसार करणे भाग आहे, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी स्पष्ट केले आहे. India export almost seven crore vaccine dose to other nations

ते म्हणाले, लस पुरवठ्याबाबत दिल्ली आणि अन्य राज्यांची सरकारे जनतेत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत; भारत सरकारने विदेशांत सर्वच म्हणजे साडेसहा कोटी लशी मोफत पाठवल्या, हा अपप्रचार आहे.



भारताने ११ मे २०२१ पर्यंत लशीचे सुमारे ६ कोटी ७० लाख डोस विविध देशांमध्ये पाठवले. केवळ १ कोटी ७ लाख डोस मदतीच्या स्वरूपात पाठवले. बाकी ८४ टक्के लशी आंतरराष्ट्रीय करारानुसार पाठविणे आवश्यपक होते, म्हणून पाठविल्या. जागतिक आरोग्य संघटनेने लस उत्पादनाचा परवाना भारताला मिळवून देण्याबाबत मोठी मदत केली.

या संघटनेच्या करारानुसार भारताला देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या अशा लशींचा काही भाग इतर कोरोनाग्रस्त देशांच्या मदतीसाठी पाठवावा लागतो. त्यामुळे आज जे यावर टीका करत आहेत त्यांचे सरकार असते तरी त्यांना तसेच करणे भाग पडले असते.

India export almost seven crore vaccine dose to other nations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात